कोकरुड: काल, रविवारी लक्ष्मी पूजनादिवशीच शिराळा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. तीन गावात सात कुटुंबाची घरफोडी करत अंदाजे दहा तोळे, वीस हजार आणि दोन मोटरसायकली असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची तक्रार कोकरुड पोलिसात देण्यात आली आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, घरोघरी लक्ष्मीपूजनची धामधूम होती. मध्यरात्रीच्या सुमारास समतानगर, गवळेवाडीमध्ये चोरट्यांनी घरे फोडून मुद्देमाल लंपास केला. याबाबतची माहिती हत्तेगाव पोलीस पाटील विट्ठल उंडाळकर यांनी कोकरुड पोलिसांना दिली. कोकरुड पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. येळापुर ते गवळेवाडी या तीन किलोमीटर अंतरात एकाच रस्त्यावर तीन गावात घरफोड्या केल्या असून असाच प्रकार काही महिन्या पूर्वी शिराळा -कोकरुड रस्त्यावर झाला होता. पोलिसांसमोर चोरट्यांनी एक प्रकारचे आव्हान उभे केले आहे.
Sangli: लक्ष्मीपूजन दिवशीच चोरट्यांचा धुमाकुळ, सात घरे फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:12 IST