शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
2
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
3
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
4
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
5
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
6
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
8
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
9
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
10
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
11
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
12
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
13
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
14
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
15
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
16
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
17
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
18
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
19
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
20
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद

Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:01 IST

आमदारांच्या आरोपाला काय उत्तर देणार? याकडे लक्ष

सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या सांगली-मिरजेच्या आमदारांनी थेट विरोधाची आघाडी उघडली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे. आमदारांच्या आरोपाला पालकमंत्री काय उत्तर देणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.स्थानिक पातळीवर निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत असून बाहेरून आलेल्या आयारामांना प्राधान्य दिले जात असल्याची नाराजी आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ अशी लढाई रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजपने सहा महिन्यापूर्वीच हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच मोहिमेत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात दाखल करून घेण्यात आले. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे भाजपचा आकडा वाढला, मात्र अस्वस्थतेचा ज्वालामुखीही पेटला. याचा प्रत्यय बुधवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या लेटरबाॅम्बमधून भाजप कार्यकर्त्यांना आला.

वाचा: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह दिवाळीच्या आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जाऊ लागली. पण त्याच प्रभागातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली.गेली पाच वर्षे नगरसेवक पदासाठी तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. यातील बहुतांश कार्यकर्ते सुधीर गाडगीळ यांचे समर्थक मानले जातात. आपल्या गटालाच हादरे बसल्याने स्वत: गाडगीळ मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट पालकमंत्र्यांविरोधातच आघाडी उघडली. सहा नगरसेवक पक्षात आले असताना २२ तिकिटे कुणाला देणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केला. गाडगीळ यांच्या पाठोपाठ मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनीही चंद्रकांतदादांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

वाचा : संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पटदरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या आरोपांना कोणते उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटील यांच्या भूमिकेवरूनच पक्षातील पुढील समीकरणे ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भाजपात निष्ठावंत विरुद्ध आयाराम संघर्ष होणारआमदारांच्या भूमिकेमुळे पक्षात नव्याने एन्ट्री केलेले कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने निष्ठावंत नाराज आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध आयाराम असा संघर्ष होणार आहे. या घडामोडींचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पक्षात समन्वय राखण्यासाठी उच्च पातळीवर हस्तक्षेप आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांमध्ये आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli BJP feud: Gadgil's letter bomb ignites conflict against Patil.

Web Summary : Sangli BJP faces infighting as Gadgil and Khade criticize Patil's leadership before elections. Loyalists versus newcomers clash over ticket distribution, potentially impacting upcoming municipal elections. Tensions escalate.