शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

NCP: राष्ट्रवादीमध्ये वाद हवेत, मग संवाद कार्यक्रम कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:37 IST

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत ...

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वाद हवे असल्याचे सांगितले. वाद असायला हवेत, तर संवाद यात्रा कशासाठी असा प्रश्न आता सामान्य कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. गटबाजीमुळे होणारी कुचंबणा यापुढेही कायम राहण्याचे संकेत असल्याने पक्षांतर्गत नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत.

सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत विभागली गेली आहे. एका गटाच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या गटाकडून झिडकारले जाते. पदांच्या वाटपातही हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष व विधानसभा क्षेत्राध्यक्षांमधील वादाची परंपराही खूप जुनी आहे. सांगली विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष दिवंगत कमलाकर पाटील यांनी या गटबाजीवर अनेकदा बंड पुकारले होते. आता उघडपणे या गोष्टी समोर येत नसल्या तरी गटबाजी कायम आहे.सांगलीत परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील यांनी स्वत: भाषणात अशी तक्रार आपल्याकडे आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर त्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र दुसरीकडे हे वाद हवेत, असे मतही मांडले. पक्षात सर्व सुरळीत असेल तर दृष्ट लागते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेने सध्या पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

(सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..)

सांगली, मिरजेत गेल्या तीन वर्षांत अन्य पक्षातून अनेक दिग्गज पदाधिकारी, नेते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांनाही या गटबाजीचा त्रास होत आहे. पक्षातील ही गर्दी वाढत असताना वादाची तीव्रताही वाढत आहे. पक्षात मुक्तपणा नसल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे जयंत पाटील दुर्लक्ष करणार का, असा सवालही उपस्थित होतो. अन्य पक्षातून राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतील या गटबाजीमुळे सावधगिरीची भूमिका घेतल्याचे समजते.

आंदोलनाबाबत कोंडी

कोणत्याही प्रश्नावर एखाद्या पदाधिकायाला आंदोलन करायचे असेल किंवा पत्रकबाजी करायची असेल तर त्याची कल्पनाही ठराविक नेत्यांना द्यावी लागते, अशी खंत काहींनी व्यक्त केली. या समस्या नंतर पक्षासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील