शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

भिडेंची शेतीच नाही, तर आंबा कोठून देणार? नितीन चौगुले; माध्यमांकडून विपर्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:12 AM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे,

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

भिंडेंची शेतीच नाही, तर ते औषधी आंबा कोठून देणार? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता, तोच भिडेंनी सांगितला; पण प्रसारमाध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले.

भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० दाम्पत्यांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली.

चौगुले म्हणाले की, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते ३५ वर्षांनी भेटले. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, धाराशीव येथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. तिचे झाड वाढवले. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे.हा बदनामीचा डावदोन वर्षांपासून समाजविघातक शक्ती संभाजी भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत असल्याचा आरोप चौगले यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप