शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Sangli: विश्वजीत कदम-संग्रामसिंह देशमुख आमने-सामने येणार?, पलूस येथे भाजपात बैठकांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:50 IST

विनोद तावडे यांच्याकडून आढावा

इकबाल मुल्लापलूस : येत्या विधानसभा निवडणुकीचा बार नोव्हेंबर महिन्यात उडण्याची शक्यता आहे. हे गृहित धरून पलूस तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या महिन्यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पलूस तालुक्याचा धावता दौरा करत काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी संग्राम देशमुख यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले आहेत.गेल्या आठवड्यात भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारूक जमादार यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची माळवाडी (ता. पलूस) येथे आढावा बैठक घेतली. येथील प्रलंबित कब्रस्तान व दावल मलिक मदनशा दर्गा विकासासंदर्भात चर्चा केली. यावेळी ऋषी टकले, अमीर सलामत, आजम मकानदार, अस्लम अत्तार, इमानुल सुतार यांच्यासह भिलवडी व माळवाडी येथील नागरिक उपस्थित होते.

पलूस-कडेगाव मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील जागा शिवसेनेकडे गेल्याने पक्षाच्या आदेशानुसार संग्रामसिंह देशमुख यांना थांबावे लागले होते. परंतु, यावेळी भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम-संग्रामसिंह देशमुख आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तसेच मागील निवडणुकीत घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती न करता भाजपा निर्णयावर ठाम राहिली. तर पलूस-कडेगाव मतदारसंघात एकास एक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शरद लाड यांची भूमिका निर्णायकक्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांची पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी केली आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नाही. परंतु, ते महाविकास आघाडीसोबत जाणार की अन्य कोणती भूमिका घेणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, मतदारसंघातील विजयी उमेदवारासाठी शरद लाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीpalus-kadegaon-acपलूस कडेगावvidhan sabhaविधानसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपा