शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:36 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पक्षप्रवेशाचा बार

सांगली : महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. सांगली, मिरजेसह ग्रामीण भागातील नेत्यांसाठी पायघड्या अंथरल्या असून, विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर पक्ष प्रवेशाचा बार उडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील माजी आमदार मंडळींचा समावेश आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काही माजी आमदार व नेतेमंडळी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिका आणि दुस-या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्या लढविण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सांगलीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले होते. मित्रपक्ष काय करतील? याकडे लक्ष न देता तयारी करा, अशी सूचना केली होती.दरम्यान, जिल्हयातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तयारीला लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी काही माजी आमदार मंडळींना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर मिरजेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील व निशीकांत पाटील यांच्या उपस्थित सोमवारी गोपनीय बैठक झाली. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे व माजीमंत्री शिवाजीराव नाईक हे उपस्थित होते.

पाटील यांना सोडून अजित पवार यांच्याकडे कल..शिराळ्याचे माजीमंत्री शिवाजीराव नाईक हे चारच दिवसांपूर्वी (शनिवारी) सांगलीत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजर होते. व्यासपीठावर पहिल्या रांगेत जयंत पाटील यांच्याशेजारी बसले होते. ते सोमवारी अजित पवार यांच्याकडे प्रवेशासाठी मिरजेत शासकीय विश्रामगृहातील बैठकीत सामील झाल्याचे पाहायला मिळाले. विलासराव जगताप हेदेखील काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्यासोबत दिसले होते. त्यांनीही आता अजित पवार यांच्याकडे दिशा बदलली आहे. जतचे नेते सुरेश शिंदे हेदेखील पक्षप्रवेशात सोबत असतील, असे सांगण्यात आले. या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ताकद मिळणार आहे.

जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेतजिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचे नावही राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाच्या यादीत चर्चेत आहे. यापूर्वी त्यांनी काहीवेळा अजित पवार यांच्या भेटी घेतल्याचीही माहिती आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांचाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने जयश्रीताई पाटील यांनी आमच्या पक्षात येणे फायद्याचेच ठरणार आहे. महापालिका क्षेत्रात त्यांना मानणारा मदनभाऊ पाटील गट प्रबळ आहे. महापालिकेत सत्ता येण्याच्यादृष्टीने त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू आहे. - पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने आमची प्राथमिक बैठक मिरजेत झाली. अधिवेशन संपल्यानंतर पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहोत. आमच्यासोबत आणखी काही नेते राष्ट्रवादीमध्ये येतील. - विलासराव जगताप, माजी आमदार

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार