शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 18:17 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

मित्राचा किस्सा बोलून दाखविला; माध्यमांकडून विपर्यास

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. भिंडेंची शेतीच नाही, ते औषधी आंबा देणार कोठून? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता. तो भिडेंनी सांगितला. पण माध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले. भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० महिलांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांनी प्रसिद्ध केले होते. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोशल मीडियावरुनही या विधानाची खिल्ली उडविण्यात आली. अजूनही सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. नाशिकच्या सभेत भिडे काय बोलले, माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास कसा केला, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. चौगुले म्हणाले, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते हे तब्बल ३५ वर्षांनी भेटले. त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, मला फळबाग शेतीची खूप आवड आहे. मी धाराशीव जिल्ह्यात गेलो होती. तिथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळून आल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. या कोयीचं रोपटं करुन ते झाड वाढवलं. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे. 

चौगुले पुढे म्हणाले, मोहिते यांनी जो किस्सा सांगितला, तोच भिडेंनी नाशिकच्या सभेत कथन केला. अडीच तास त्यांचे भाषण सुरु राहिले. पण माध्यमांनी नेमके त्यांचे आंब्याच्याबाबतीतील तीन मिनिटांचे विधानच प्रसिद्ध केले, तेही खोटे. ज्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यांनी भिडेंची माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. 

म्हणून आंब्याचा दिला दाखला...चौगुले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे एक आम्रवृक्षच आहेत. त्यांच्याकडे महामृत्युंजय मंत्र, महासंजीवनी मंत्र, महाअमृत मंत्र होता. या अमृताचे आजच्या पिढीने प्राशन केले, तर हा हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या रक्त गटाचा बनेल, असेही भिडे यांनी नाशिकच्या सभेत नमूद केले होते. यासाठी त्यांनी मोहिते यांच्या शेतातील आंब्याचे उदाहरण दिले होते. 

शेतीच नाही : बदनामीचा डावचौगुले म्हणाले, भिडे यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. ते बालब्रम्हचारी व संन्याशी आहेत. सांगलीत गावभागात एका कार्यकर्त्याने दिलेल्या दहा-बाय-दहाच्या खोलीत ते राहतात. अंथरुण-पांघरुणही नाही. फरशीवर झोपतात आणि धोतर अंगावर घेतात. त्यांची कुठेही मालमत्ता अथवा शेती नाही. मग त्यांची आंब्याची बाग कशी असेल? प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे. तरीही त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन खोटे वृत्त प्रसिद्ध केले. गेल्या दोन वर्षापासून समाजविघातक शक्ती भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत आहेत. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत त्यांना अडकविण्यात आले. पुण्यात वारीमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी तलवारी घेऊन घुसल्याचा आरोप करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे