शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील दीड हजार शाळांत सीसीटीव्हीच नाहीत, गैरप्रकार रोखणार कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:29 IST

शाळांची मान्यता कधी रद्द करणार?

सांगली : शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. तसा शासन निर्णय २१ ऑगस्ट २०२४ रोजी घेत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील केवळ एक हजार ५०४ शाळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. इतर शाळा प्रशासनाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे.मागील काही दिवसांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींसोबत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळेतीलच काही विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्यांनी मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य तर मुलींना धमकावत त्यांची छेड काढणे व गैरफायदा घेणे, असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतला.खासगी व्यवस्थापनाच्या सर्वच शाळांमध्ये महिनाभराच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश २१ ऑगस्ट २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाचे अव्वर सचिव प्रमोद पाटील यांनी काढले होते, तसेच शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये डीपीडीसी अथवा ग्रामपंचायतच्या शिक्षणासाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीतून कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.परंतु, जिल्ह्यातील माध्यमिकच्या ७६४ शाळांपैकी ४६८ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. २९६ शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिकच्या एक हजार ६८६ शाळा असून, त्यापैकी केवळ ४७८ शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्वाधिक एक हजार २०८ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत.

शाळांची मान्यता कधी रद्द करणार?खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने महिनाभरात शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत, परंतु चार महिने लोटले, तरी बहुतांश शाळांनी कॅमेरे बसविण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या शाळांचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे ही कारवाई कधी करणार आहे? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ५.३१ कोटी मंजूर : मोहन गायकवाडजिल्हा परिषदेच्या एक हजार २०८ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कौटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाcctvसीसीटीव्हीzpजिल्हा परिषद