...मगच शिक्षकांना सोडावे, जत तालुका पंचायत समिती बैठक : मासिक बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:56 IST2018-08-24T22:54:14+5:302018-08-24T22:56:10+5:30

जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक

... Then leave the teachers, Jat Taluka Panchayat Samiti meeting: Various resolutions in the monthly meeting | ...मगच शिक्षकांना सोडावे, जत तालुका पंचायत समिती बैठक : मासिक बैठकीत विविध ठराव

...मगच शिक्षकांना सोडावे, जत तालुका पंचायत समिती बैठक : मासिक बैठकीत विविध ठराव

जत : जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक असलेल्या ठिकाणी राहावे, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करावी, नवीन शिक्षक येऊन येथे हजर झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना तालुक्यातून बाहेर सोडण्यात यावे, असे ठराव एकमताने संमत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती मंगल जमदाडे होत्या.

यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे, सदस्य रवींद्र सावंत, मनोज जगताप, आप्पा मासाळ, मनोज जगताप, दºयापा हत्तळ्ळी, दिग्विजय चव्हाण, अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे, विष्णू चव्हाण, अर्चना पाटील, सुशिला तावशी, कविता खोत, लक्ष्मी माळी उपस्थित होते.

चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणाºया निधीचा मुद्दा अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी उपस्थित केला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीचे अकौंट लॉक केल्यामुळे सरपंचांच्या अधिकारावर गदा आली आहे, असा आरोप केला. त्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणाले की, अधिकारावर गदा आणण्याचा हा मुद्दा नसून या निर्णयामुळे सरपंचाला अंधारात ठेवून जो मनमानी कारभार व गैरव्यवहार होत होते, ते आता बंद झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकौंट लॉक हा पर्याय काढण्यात आला आहे.

कविता खोत यांनी संख मध्यम प्रकल्पातील अतिक्रमण काढावे व तालुक्यात काही ठिकाणी रस्त्याची निकृष्ट कामे होत आहेत, त्याची चौकशी करावी, त्यानंतर बिले आदा करावीत, असा ठराव घ्यावा, अशी मागणी केली.
रवींद्र सावंत व आप्पा मासाळ यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या कामाचे वाभाडे काढले. पं. स. विश्रामगृहात कोणालाही विश्वासात न घेता आणि माहिती न देता जे बदल केले आहेत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व झालेली चूक दुरुस्त करुन घेण्यात यावी अशी मागणी केली.

ग्रामसेवकांवर कारवाई करा
एकही ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाही. याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लेखी आदेश काढून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सांगितले. तालुक्यात बाहेरून शिक्षक आल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना सोडावे व बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाहीत, अशा ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी केली असता, वरिष्ठ पातळीवरुन शिक्षण सचिवांचा दबाव आहे. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोडण्यात यावे, असा आदेश आहे असे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: ... Then leave the teachers, Jat Taluka Panchayat Samiti meeting: Various resolutions in the monthly meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.