शेगावला पावणेचार लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:10+5:302021-07-09T04:18:10+5:30
भोईटे कुटुंबीय बुधवारी रात्री शेताकडे गेले होते. सकाळी घरी येऊन पाहिले असता घराचा कडी-कोयंडा उचकटल्याचे व चोरी झाल्याचे लक्षात ...

शेगावला पावणेचार लाखांची चोरी
भोईटे कुटुंबीय बुधवारी रात्री शेताकडे गेले होते. सकाळी घरी येऊन पाहिले असता घराचा कडी-कोयंडा उचकटल्याचे व चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर भोईटे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटातील तीन तोळ्यांच्या तीन अंगठ्या, १० हजार रुपयांची चांदीची नाणी व रोख रक्कम असा ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरटे चोरी करून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. वर्णनानुसार एकास जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीनंतर श्वानपथक बोलविले होते; मात्र चोरटे वाहनाने गेल्याने श्वान तेथेच घुटमळले. संशयिताची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांचे पथक तपासासाठी बाहेरगावी पाठविण्यात आले आहे.