सलून दुकानातून सव्वातीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:43+5:302021-06-23T04:18:43+5:30
--------------- सांगलीत मोबाइलसह रोकड लंपास सांगली : शहरातील कुदळे प्लॉट परिसरातील घरातून मोबाइलसह दहा हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेली. ...

सलून दुकानातून सव्वातीन लाखांची चोरी
---------------
सांगलीत मोबाइलसह रोकड लंपास
सांगली : शहरातील कुदळे प्लॉट परिसरातील घरातून मोबाइलसह दहा हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आदित्य अंकुश लोंडे यांनी फिर्याद दिली. पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील दहा हजार रुपये घेतले. बाहेर येऊन परत काही मिळते का हे पाहण्यासाठी परत गेला. मोबाइल घेऊन पोबारा केला.
----------
महिलेकडून मोबाइल लंपास
सांगली : अज्ञात महिलेने एकाचा मोबाइल लंपास केला. ही घटना रविवारी सव्वादोन वाजता गजानन बेकरी जवळ घडली. याबाबत विशाल सुभाष आठवले (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------
पोलिसांकडून दोघांना अटक
सांगली : हिराबाग वाॅटर वर्क्सजवळ रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लपून बसलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसंत हातागळे (वय २५, रा. रेल्वे स्टेशनजवळ) व संतोष जाधव (वय ३३, रा. रेल्वेस्थानकाजवळ, सलगर वस्ती, सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.