शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली सायबर पोलिसांकडून चोरी, हरविलेल्या १३८ मोबाईलचा शोध, १४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

By शीतल पाटील | Updated: August 21, 2023 16:24 IST

सांगली : सांगलीच्या सायबर शाखेचा तपासाचा आलेख दिवसेदिवस वाढत चालला आहे. गेल्या महिन्याभरात सायबर शाखेला चोरी व हरविलेल्या १३८ ...

सांगली : सांगलीच्या सायबर शाखेचा तपासाचा आलेख दिवसेदिवस वाढत चालला आहे. गेल्या महिन्याभरात सायबर शाखेला चोरी व हरविलेल्या १३८ मोबाईलचा शोध घेण्यात यश आले. याची किंमत जवळपास १४ लाख रुपये इतकी आहे. हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात येत असल्याचे सायबर शाखेचे निरीक्षक संजय हिरूगडे यांनी सांगितले.सायबर शाखेने ऑनलाईन फसवणुकीतील अनेक गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आहे. आता या शाखेकडून चोरी व गहाळ झालेले मोबाईल शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली, अप्पर अधिक्षक तुषार पाटील यांच्या आदेशाने ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी सायबर पोलिस ठाण्यातर्गंत मोबाईल थेप्ट युनीट स्थापन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीद्वारे तपास करण्यात आला. यात महिन्याभरात पाच लाख किंमतीचे ५० मोबाईल मिळून आले. तसेच सायबर पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांना तांत्रिक माहिती पुरवून ८८ मोबाईल हस्तगत करण्यास मदत केली. यात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील १२, महात्मा गांधी चौकीकडील २७, इस्लामपूर पोलिस ठाणे २७ आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २२ मोबाईलचा समावेश आहे. महिन्याभरात १३८ मोबाईलचा शोध घेतला आहे. गत जानेवारी महिन्यात १५० मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले होते. आताही हस्तगत केलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात येत आहेत.या कारवाईत निरीक्षक हारुगडे यांच्यासह उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडेवाडे, इम्रान महालकरी, रुपाली पवार, रेखा कोळी, सलमा इनामदार यांनी भाग घेतला.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीPoliceपोलिस