शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By अशोक डोंबाळे | Updated: December 22, 2023 18:52 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेले सराफ दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटले. दुकानातील राेख रकमेसह साेन्या-चांदीचे दागिने ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेले सराफ दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटले. दुकानातील राेख रकमेसह साेन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सराफ व्यावसायिक योगेश भुपाल जंगम (वय ३८, रा. जत रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.कवठेमहांकाळ येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ याेगेश जंगम यांचे यश ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दुकानात त्यांनी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली आहे. गुरुवार दि. २१ रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जंगम घरी गेले. शुक्रवार दि. २२ रोजी पहाटे २ वाजून २७ मिनिटांनी जंगम यांच्या मोबाईलवर दुकानातील कुलपाशी छेडछाड हाेत असल्याचा गजर वाजू लागला. लगेचच ते माेटारीतून दुकानाकडे आले. यावेळी दुकानाचे लाेखंडी शटर अर्धवट उघडे व आतील कुलूप तुटलेले दिसले. दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी कवठेमहांकाळ पाेलिसांशी संपर्क साधला. कवठेमहांकाळ पोलिसही काही क्षणातच घटनास्थळी पाेहाेचले. दुकानात जाऊन पाहिले असता विक्रीस ठेवलेले चांदीचे दागिने, बेन्टेक्सचे दागिने, सोन्याची मोड व सात हजार रुपये रोख तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन गायब हाेते. दीड लाख किमतीचे तीन किलो चांदीचे तयार दागिने, एक लाख किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोड, दहा हजारांचे बेन्टेक्सचे दागिने, सात हजारांची रोकड व पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन असा २ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी पाहणी केली. श्वानपथकाच्या मदतीने चाेरट्यांचा माग काढण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस