शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

Accident News Sangli: भरधाव टँकरचे चाक निखळले अन् महिलेच्या डोक्यावर आदळले; जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:46 IST

टँकरचालकाला अपघाताची कोणतीच कल्पना नसल्याने तो अतिवेगाने तसाच पुढे जात होता

आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथे वेगवान टँकरची मागील दोन चाके निखळून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर आदळली. तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गावर घडली. याबाबत सुरेश मधुकर सूर्यवंशी (वय ३२, रा. भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) या चालकास अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रकाश जयवंत पवार यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे.झरे येथील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे मालक सुरेश पवार मंगळवारी सकाळी पत्नीसह पाली-खंडोबाला निघाले हाेते. दुकानाच्या मागील बाजूलाच त्यांचे घर आहे. देवदर्शनास जाण्यासाठी पती-पत्नी घरातून बाहेर पडले. सुरेश पवार दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन स्वच्छ करत होते, तर त्यांच्या पत्नी राणी रस्त्यालगत येऊन थांबल्या होत्या. याचवेळी त्यांच्या शेजारील नारायण सकट यांच्या वाघजाई बोअरवेल या दुकानातून गवंडीकाम करणारे प्रकाश जयवंत पवार (रा. तरसवाडी, ता. खटाव) पत्नी संगीता यांच्यासह बाहेर पडले. ते रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीवर बसत असताना, काही क्षणातच पश्चिमेकडून झरेच्या दिशेने अतिवेगाने टँकर (क्र. एमएच ५० - ८८८८) आला. अचानक या टँकरची मागील दोन चाके निखळली. निखळलेल्या चाकांचा जोड थेट संगीता पवार यांच्या डोक्यावर आदळला. गंभीर मार लागल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या राणी पवार यांनाही या चाकाची जोरदार धडक बसली. त्याही गंभीर जखमी झाल्या.ही चाके तशीच धावत पुढे काही वाहनांवर जाऊन आदळली. यामध्ये दोन दुचाकींचे (क्र. एमएच १० सीसी ३०७७ व एमएच ११ सीए ३८५९) तसेच मालवाहतूक वाहनाचे (क्र. एमएच १० डीटी ०१४७) मोठे नुकसान झाले. त्यानंतर वेगात असणाऱ्या चाकाने सचिन राजमाने यांच्या दुकानासमोरील तसेच ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला धडक दिली. त्यामध्ये भिंत कोसळली.चालक अनभिज्ञ, पाठलाग करुन रोखलेदरम्यान, टँकरचालकाला अपघाताची कोणतीच कल्पना नसल्याने तो अतिवेगाने तसाच पुढे शेनवडीच्या दिशेने (ता. माण) जात होता. गावातील काही तरुणांनी पाठलाग करून त्यास रोखले. अपघाताची माहिती आटपाडी पोलिसांना देण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू