शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:56 IST

बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे

जत : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सहकाराच्या नियमात आणि घटनेत बदल करत आहे. बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. यासाठी सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलकडे एकहाती सत्ता द्या, असे आवाहन करत जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न येत्या दाेन वर्षात सोडवू, अशी ग्वाही माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साेमवारी दिली.दरिकोणूर (ता. जत) येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, जयश्रीताई पाटील, अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समितीच्या उमेदवारीबाबत काही लाेक नाराज झाले असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि भाजपाच्या विचाराला बाजूला सारण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे. जत तालुक्यासाठी आम्ही सर्वात जास्त जागा दिल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी येथे एकदिलाने काम करत आहे. येणाऱ्या काळात जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. मी मंत्री असताना सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. पण, दुर्दैवाने सरकार गेल्याने ही योजना पूर्ण झाली नाही.आता सत्ताधारी सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे, पण कामाला सुरुवात नाही. तरीही येत्या अडीच वर्षात जतच्या शिवारात पाणी आणण्याची जबाबदारी मी व विश्वजित कदम यांनी घेतली आहे. पाणी आल्यानंतर सर्वात जास्त फायदा जतला होणार आहे. यासाठी बाजार समितीही आपल्या ताब्यात असायला हवी.सभेस सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, सुजयनाना शिंदे, स्वप्नील शिंदे, बसवराज बिराजदार, पिराप्पा माळी, गणी मुल्ला, अमिन शेख, मच्छिंद्र वाघमोडे यांच्यासह संख, जाडर बोबलाद, दरिबडची, मुचंडी या चार जिल्हा परिषद गटातील सोसायटी व ग्रामपंचायत गटाचे मतदार, उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा