शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी दिवसात सहा फुटाने वाढली; म्हैसाळ, राजापूर बंधारे पाण्याखाली

By अशोक डोंबाळे | Updated: July 20, 2023 13:21 IST

जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात जोरदार

सांगली : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात पाऊस जोरात सुरू आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोयना धरण क्षेत्रात २५३ मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कृष्णा नदीची दिवसात सहा फूट पाणीपातळी वाढून गुरुवारी १२ फूट ६ इंच झाली आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ, राजापूर बंधारे आणि वारणा नदीवरील दुधगाव (ता. मिरज) येथील खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे.जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. पण, गुरुवारी सकाळी सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. शिराळा, वाळवा तालुक्यात मात्र पाऊस सुुरू आहे. वारणा-चांदोली धरण क्षेत्रात सलग दुसऱ्यादिवशी अतिवृष्टी झाली असून चोवीस तासात १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कोकरूड बंधाऱ्यासह समतानगर जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच दुधगाव येथील खोची बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये : मिरज ५.९ (८९.९), जत १.१ (७१.७), खानापूर ५ (६६.१), वाळवा १८.४ (१०२), तासगाव ६.९ (१०६.६), शिराळा ४१ (२८८.५), आटपाडी १ (६५.५), कवठेमहांकाळ २.१ (७३.१), पलूस १४.२ (८२.९), कडेगाव ९.७ (७८.२).

धरणातील पाणीसाठाधरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना ३७.३७ (१०५.२५), धोम ५.९९ (१३.५०), कन्हेर ३.३९ (१०.१०), वारणा १९.०७ (३४.४०), दूधगंगा ७.४८ (२५.४०), राधानगरी ५.२३ (८.३६), तुळशी १.१७ (३.४७), कासारी १.५९ (२.७७), पाटगांव १.८७ (३.७२), धोम बलकवडी २.९८ (४.०८), उरमोडी ४.१९ (९.९७), तारळी ३.८६ (५.८५), अलमट्टी ३१.३९ (१२३).

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदी