शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:24 IST

सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का? हा देखील प्रश्न आहे

सांगली : दोन टप्प्यांत एफआरपी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. दोन टप्प्यांत एफआरपीची घोषणा शासनाने काल, सोमवारी केली. सरकारच्या या निर्णयावरुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

खराडे म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत गाडणारा आहे. साखर सम्राटांच्या दबावापोटी ठाकेर सरकारने निर्णय घेतला आहे. साखर सम्राट नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आले आहेत. दोन टप्प्यांत एफआरपीच्या निर्णयामुळे त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्याचा गैरफायदा घेत कदाचित तीन ते चार टप्प्यांतही एफआरपी दिली जाण्याचा धोका आहे. काही कारखानदार देणारही नाहीत, त्यामुळे हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा.खराडे म्हणाले, ज्या शासकीय समितीच्या शिफारशीने हा निर्णय घेतला आहे, ते सरकारी अधिकारी दोन टप्प्यांत पगार घ्यायला तयार होतील का? असा प्रश्न आहे. सातव्या वेतन आयोगासह एकाच टप्प्यात भरभक्कम पगार घेणाऱ्यांना शेतकऱ्याची दुखणी कळणार नाहीत. सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का हादेखील प्रश्न आहे.बेदाणा उत्पादकांना २३ दिवसानंतर पैसे, द्राक्ष उत्पादकांना गंडा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडतवाल्याकडून फसवणूक, दूध उत्पादकांना दहा दिवसानंतर पैसे अशी शेतकऱ्याची लुटमार सुरु आहे. त्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. या स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यामागे भक्कमपणे उभे रहायला हवे. याउलट शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत, हे दुदैव आहे.सरकारने हा निर्णय तातडीने मागे  घेतला नाही, तर रस्त्यावरची आरपारची लढाई लढावी लागेल. दिल्लीत सरकारला शेतकऱ्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले, त्याचप्रमाणे ठाकरे सरकारलाही गुडघे टेकायला भाग पाडू.

टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने