शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच 

By संतोष भिसे | Updated: February 13, 2026 18:15 IST

संगीता पाटील, देविका राजेघोरपडे, संध्या पाटील यांची नावे चर्चेत, पाठिंब्याचा बदल्यात अजित पवार गटालाही मिळू शकते संधी

संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषदेतील बलाबल स्पष्ट झाल्यानंतर आता अध्यक्षपद कोणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. यासाठी भाजप महायुती आणि काँग्रेस आघाडीकडे अनेक महिला इच्छुक आहेत. वाळवा, मिरज अन् जत तालुक्यांमध्येच तुर्त अध्यक्षपदासाठी रस्सीखेच दिसत आहे.अंतिम बलाबल पाहता महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंना सत्तास्थापनेची संधी आहे. दोघांचेही बहुमत अत्यंत काठावर आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठोस बहुमतासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे बहुमत निर्विवाद होणार आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) १८, काँग्रेस ११, राष्ट्रवादी (अजित पवार) ६ आणि उद्धवसेना १ यांनी हातमिळवणी केल्यास एकत्रित संख्याबळ ३६ होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. ती प्रत्यक्षात आल्यास आघाडीला सत्तेचा सोपान दूर राहणार नाही. शिवाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यातही यश येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मोठा पक्ष या नात्याने राष्ट्रवादीची (शरद पवार) अध्यक्षपदासाठी दावेदारी प्रबळ ठरू शकेल. या पक्षाच्या सर्वाधिक सात जागा वाळवा तालुक्यातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपद या तालुक्याकडे जाऊ शकते.

वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठकयेलूर गटातून निवडून आलेल्या या पक्षाच्या उमेदवार देविका राजेघोरपडे एका अर्थाने जायंट किलर ठरल्या आहेत. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भावजय आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक यांना पराभूत केले आहे. भाजपच्या जिव्हारी लागणाऱ्या पराभवांपैकी हा एक पराभव आहे. त्याचे बक्षीस म्हणून राजेघोरपडे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान दिला जाऊ शकतो. पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची बहीण संगीता पाटील (कासेगाव) तसेच वाटेगावच्या अनुभवी सदस्या संध्या पाटील यांची नावेही नाव अग्रक्रमावर आहेत.कांता वाटेगावकर (बोरगाव), मंदा माळी (पेठ), शीला मोहिते (पणुंब्रे तर्फ वारुण) आणि मीना पाटील (कवठेपिरान) या सदस्याही अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

भाजपने गणित जमविल्यास...भाजप युतीने सत्तेचे गणित जमविल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय निंबवडेच्या माधवी पडळकर यांची दावेदारी प्रबळ असेल. त्याशिवाय साईतेजस्वी देशमुख (कोकरूड), शोभा खोत (आरग), कविता पाटील (संख) यादेखील सदस्या अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

राष्ट्रवादीने सशर्त पाठिंबा दिल्यास...सत्ता स्थापण्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. या पक्षाने अध्यक्षपदाच्या अटीवर पाठिंब्याची भूमिका घेतल्यास सावित्री रवी (जाडरबोबलाद), सुजाता पाटील (देशिंग), राजेश्वरी नाईक (वाकुर्डे बुद्रूक), स्नेहल मोरे (एरंडोली) या सदस्या अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad President Post: Tug-of-War Between Walwa, Miraj, and Jat

Web Summary : Sangli Zilla Parishad's president post, reserved for women, sees competition primarily from Walwa, Miraj, and Jat. Both alliances vie for power, with potential kingmaker roles for NCP factions. Key candidates emerge from various parties; negotiations are underway.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार