शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:56 IST

आघाडीचे गणित जुळविताना नाराजांची फौजच तयार होऊ नये, म्हणून नेत्यांकडून चर्चेच गुऱ्हाळ

सांगली : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुलाखती घेऊन इच्छुकांची उत्सुकता वाढवली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आणि उद्धव सेनेने एकत्र येण्याची तयारी केली आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. काही प्रभागांमध्ये इच्छुकांपैकी एकाला निवडायचे असले तरी, उरलेले दोन-तीन लोक नाराज होत आहेत. महाविकास आघाडीचे गणित जुळविताना नाराजीची फौज तयार होऊ शकते. त्यामुळे नेत्यांकडून या चर्चेतच वेळ घालविण्याचा कल दिसत आहे.सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी आता उमेदवारीवरून सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच दिसत आहे. प्रथम अर्ज भरणे, मुलाखती घेणे अशी लोकशाही पद्धत वापरून उमेदवारीसाठी कशा रांगा लागल्या हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होत आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेचे नेत्यांनी गुरुवारी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पण या तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस - महाविकास आघाडी यांच्यात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाचा : उमेदवारीवरून भाजपमधील संघर्ष उफाळला, मुंबईतील बैठकीत दोन गटात वाद

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील यांनी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तर उद्धव सेनेला महापालिकेत १० जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे, पण त्यावरही ठोस निर्णय झालेले नाही.

तसेच, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, असेही पक्षांतील काही नेते म्हणत आहेत. जागा वाटपाच्या समस्या असल्यामुळे उपयुक्त इच्छुकांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.लक्ष्मीअस्त्र हा एकमेव फॅक्टरमहापालिका निवडणुकीत ‘लक्ष्मीअस्त्र’ हा एकमेव महत्त्वाचा घटक मानून उमेदवार निश्चितीच्या दिशेने कल दिसत आहे. मात्र ज्यांच्याकडे लोकप्रियता आहे पण आर्थिक स्थिती भक्कम नाही, अशा उमेदवारांच्या उमेदवारीवर धोक्याची तलवार कायम असल्याचे दिसते. तर काही उमेदवार शेवटच्या टप्प्यात दबाव तंत्रज्ञान वापरू लागले असून, श्रेष्ठीकडून नावे येत असल्यामुळे पॅनलच्या संतुलनाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.सामाजिक गणितांसाठी नेते दारोदरज्या भागात एखाद्या समाजाचे प्रभावशाली स्थान आहे, त्या समाजाचे दिग्गज नेते मैदानात उतरण्यासाठी नेते दारोदर फिरत आहेत. इच्छुकांची संख्या खूप असली तरीही नेत्यांच्या या गणितांमुळे अडचणी निर्माण होत आहेत. समाजाची एकतर्फी मते मिळविण्यासाठी हा पद्धत उपयोगी पडते की नाही, याचा अंदाज लावता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Alliance Seat-Sharing Talks Stall, Creating Dissension Before Election

Web Summary : Sangli's Mahavikas Aghadi faces seat-sharing deadlock for municipal elections. Disagreements among Congress, NCP, and Shiv Sena factions threaten unity. The 'Lakshmiastra' factor and social calculations further complicate candidate selection, potentially leading to internal strife.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी