शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

शाळेला राजवाड्याचे रूप, सांगलीतील समडोळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरतेय लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:53 IST

ज्ञानदान करणाऱ्या शाळेचा कायापालट

सचिन ढोलेसमडोळी : शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो, तर ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला नवा आयाम मिळू शकतो. हाच विचार करुन समडोळी  (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यात आले. कोरोनाच्या काळात खुल्या वातावरणातील शिक्षणावर संक्रांत आली. अडचणींवर मात करीत शिक्षणाचा प्रवाह सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला. आता त्यापुढे पाऊल टाकून आनंददायी शिक्षणासाठी पाऊल टाकण्यात आले आहे.मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती. तेथेच अत्याधुनिक साधने वापरून गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरू आहे.गटशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रद्धा कुलकर्णी आणि सहायक शिक्षक संचालक नामदेव माळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, प्रगतीचे कौतुक केले आहे. शिक्षक संतोष गुरव, प्रतीक्षा देवळेकर, दीपाली मगदूम, मुख्याध्यापक पाटोळे प्रयत्नशील आहेत.प्रत्येक भिंतीवर त्रिमितीय चित्रे

  • मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले असून चित्रे रेखाटली जात आहेत.
  • शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे.
  • शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे. शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.  
टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाzpजिल्हा परिषद