शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:04 IST

नागेवाडी वगळता तीन गटांत चुरस : भाळवणी, लेंगरे गटाकडे लागले लक्ष

दिलीप मोहितेविटा : खानापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचाराच्या अखेरीस भाजप विरुद्ध शिंदेसेनेत मोठी चुरस निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर यांचे होमपीच असलेला नागेवाडी जिल्हा परिषद गट वगळता उर्वरित तीन गटात चांगली टक्कर लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भाळवणी व लेंगरे जि.प. गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.खानापूर तालुक्यातील नागेवाडी, लेंगरे, करंजे व भाळवणी या चार गटासह नागेवाडी, गार्डी, लेंगरे, पारे, करंजे, बलवडी (खा.), आळसंद व भाळवणी या आठ गणात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिंदेसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपची धुरा खांद्यावर घेतली असून, शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे दोघे बंधू शिंदेसेनेचे नेतृत्व करीत आहेत. ग्रामीण भागावर आ. सुहास बाबर यांची पकड आहे. त्यामुळे त्यांनी चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणात शिंदेसेनेचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. तर विरोधी भाजपनेही सर्व गटात उमेदवार देऊन पक्षाने आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत पंचायत समितीत नक्कीच सत्तांतर होणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे.भाळवणी गटात शिंदेसेनेचे उमेदवार हिंमतराव जाधव यांच्यासमोर त्यांच्या आळसंद गावातील भाजपचे उमेदवार नितीन जाधव यांनी आव्हान उभे केले आहे, तर भाळवणी गणात भाजपचे मोहन धनवडे विरुद्ध शिंदेसेनेचे महेश घोरपडे यांच्यात लढत होत आहे. आळसंद गणात भाजपचे आकाश माने विरुद्ध शिंदेसेनेचे रोहन जाधव यांच्यात टक्कर होत आहे. नागेवाडी जिल्हा परिषदेसाठी आ. दिवंगत अनिल बाबर यांच्या स्नुषा डॉ. शीतल अमोल बाबर मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या सुजाता माने निवडणूक लढवीत आहेत. लेंगरे गटातही भाजपच्या आरती मोरे विरुद्ध शिंदेसेनेच्या मनीषा बागल यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. करंजे गटात शिंदेसेनेच्या सई शिंदे विरुद्ध भाजपच्या प्रिया खंदारे-पाटील यांच्यात चुरस असून, बलवडी खा. गणात शिंदेसेनेचे माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे विरुद्ध भाजपचे तानाजी पाटील यांच्यात टक्कर होत आहे. या लढतीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.सुहास बाबर अन् वैभव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढाईजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर व विरोधी भाजपचे नेते ॲड. वैभव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर तालुक्यात प्रचारसभा घेतल्या असल्या तरी शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर व उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे दोघे बंधूच गड लढवीत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चुरशीने होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: BJP vs. Shinde Sena face-off in Khanapur.

Web Summary : Khanapur ZP election witnesses a fierce battle between BJP and Shinde Sena. Suhas Babar and Vaibhav Patil's prestige is at stake. Focus on Bhalwani and Lengre groups. Tight contests in four ZP and eight Panchayat Samiti constituencies.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा