शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: सांगली झेडपीतील सत्तेसाठी मुंबईत चर्चेच्या फेऱ्या; सुहास बाबर उपमुख्यमंत्र्यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:21 IST

सांगलीत भाजपची गटनेता निवड

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाला आठवडा झाला, तरी सत्तेची गणिते अद्याप सुटलेली नाहीत. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बैठकांचे आणि चर्चेचे सत्र सुरू आहे. दरम्यान, बुधवारी भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्तरावर महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरजेत सोमवारी शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासोबत झालेली बैठक निर्णयाविना संपली. तीनही पक्ष अध्यक्षपदावर अडून आहेत. हा प्रश्न आता मुंबईत पोहोचला असून तेथेच तोडग्याची अपेक्षा आहे. उद्या (बुधवारी) महायुतीचे वरिष्ठ नेते आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे. पक्षप्रमुखांसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय नेला जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.सत्तास्थापनेचे गणित सुटले नसले, तरी भाजपने आपल्या स्तरावर गटस्थापनेची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या १६ सदस्यांची बैठक बुधवारी (दि. १८) सांगलीत बोलविण्यात आली आहे. त्यावेळी गट स्थापना केली जाणार आहे. तसेच गटनेताही निवडला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली. गटनेता कोण होणार? याचा निर्णय सदस्यांच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्य पक्षाने भाजपला निवडणुकीपूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. यामुळे या तिघांचे एकत्रित संख्याबळ १८ झाले आहे. बुधवारी भाजपच्या गटस्थापनेच्या आणि गटनेता निवडीच्या बैठकीला हे दोन्ही पक्षांचे सदस्य उपस्थित राहणार नाहीत, मात्र एक-दोन दिवसांत त्यांच्या अधिकृत पाठिंब्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.शिंदेसेनेनेही पाठिंबा आणि अध्यक्षपद यासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये कुणासोबत युती करायची, तसेच अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बाबर यांची संध्याकाळपर्यंत भेट झाली नाही. आता बुधवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ते सहभागी होण्याची शक्यता आहे. बैठकीत अध्यक्षपदाचा तोडगा निघणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीचा आज मेळावाराष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आणि त्यांचा सत्कार सोहळा. बुधवारी सांगलीत होणार आहे. विश्रामबागमध्ये कुपवाड रस्त्यावर उत्कर्ष हॉलमध्ये दुपारी १२ वाजता मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली. त्याचवेळी गटस्थापना आणि गटनेत्याच्या निवडीची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सदस्यांचा सत्कार होणार आहे.

सांगलीची स्थिती फारच अवघड!दरम्यान, सत्तास्थापना आणि अध्यक्ष निवडीचा विषय गुंतागुंतीचा होत असल्याने भाजप नेतेही विचारमंथनात आहेत. स्वत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना सांगलीची स्थिती फारच अवघड असल्याचे वक्तव्य केले आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत सहकारी पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. भाजपला पाठिंब्याबाबत सहकारी पक्षांत राजकीय मतभेद स्वाभाविक आहेत. यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात (अजित पवार) काही ठिकाणी लढलो असलो आणि काही वेळा त्यांच्याविरोधात राजकारण केले असले, तरी जिल्हा परिषदेत सत्तेचे गणित जमण्याविषयी शंका नाही. - सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Power Struggle: Discussions in Mumbai, Suhas Babar Meets Deputy CM

Web Summary : Sangli ZP power equations remain unresolved. Coalition talks are ongoing, with key leaders meeting in Mumbai to find a solution regarding the president post. BJP prepares for group formation. Discussions continue amidst political complexities.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMumbaiमुंबई