शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-ZP Election: तासगावात नेत्यांच्या भूमिकेवर ठरणार इच्छुकांचे राजकीय भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:14 IST

युती, आघाडीच्या समीकरणांचे त्रांगडे; इच्छुकांची रस्सीखेच

दत्ता पाटीलतासगाव : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणात इच्छुकांची मोठी रस्सीखेच आहे. युती आणि आघाडीच्या समीकरणांवर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेवरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.तासगाव नगरपालिका निवडणुकीत युती आणि आघाडीचे त्रांगडे उडाले होते. यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही निवडणूक संपता संपताच माजी खासदार संजय पाटील यांच्या राजकीय भूमिकेने पुन्हा ‘यू टर्न’ घेतल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.गतवेळच्या निवडणुकीत आबा गट विरुद्ध काका गट असाच दुरंगी सामना पाहायला मिळाला होता. त्यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आबा गटाला यश मिळाले होते, तर तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांचा गट पिछाडीवर राहिला होता. यावेळी मतदारसंघात अनेक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मतदारसंघातील आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच गटावर सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. विशेषतः आमदार रोहित पाटील यांच्याकडे उमेदवारीची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.अद्याप युती आणि आघाडीचे समीकरण स्पष्ट झाले नाही. सहापैकी दोन जिल्हा परिषद गट खानापूर–आटपाडी विधानसभा मतदारसंघात येत आहेत. त्या मतदारसंघातील नेत्यांची भूमिका काय असणार हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेवरच इच्छुकांचे भवितव्य ठरणार असून, त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

संजयकाका पुन्हा घड्याळ हातात बांधणार?तासगाव नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीशी फारकत घेत संजय काकांनी विकास आघाडीचा झेंडा हातात घेतला. स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोच संजय काकांनी महापालिका निवडणुकीत घड्याळ हातात घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संजय काका ‘यू टर्न’ घेत पुन्हा घड्याळ हातात बांधणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विसापूर गटात नेत्यांच्या भूमिकेची उत्सुकतामांजर्डे आणि विसापूर जिल्हा परिषद गटाचा खानापूर–आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या दोन गटात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे वैभव पाटील यांचा कनेक्ट आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या बाबतीत खानापूरच्या नेत्यांची भूमिका काय असणार, याचीही उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: Leaders' decisions to shape aspirants' political future.

Web Summary : Tasgaon ZP election heats up. Leaders' stance crucial for aspirants amid shifting alliances. Sanjaykaka's potential U-turn adds suspense. Khanapur leaders' role in Visapur key.