शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आश्रमशाळेला कुंटणखाना बनवणाऱ्याची रवानगी तरुंगात, अरविंद पवार शिवसेनेचा पूर्वाश्रमीचा पदाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:42 IST

युनूस शेख इस्लामपूर : सामान्य आणि दुर्बल कुटुंबातील असाह्य अल्पवयीन मुलींना स्वत:च्या हौसेची शिकार बनवणाऱ्या नराधम अरविंद पवार आणि ...

युनूस शेखइस्लामपूर : सामान्य आणि दुर्बल कुटुंबातील असाह्य अल्पवयीन मुलींना स्वत:च्या हौसेची शिकार बनवणाऱ्या नराधम अरविंद पवार आणि या कुकर्मात त्याची साथ देणाऱ्या महिलेस न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेचा दणका देत असाह्य आणि दुर्बल घटकांवरील अत्याचार कायद्याच्या कक्षेत खपवून घेतला जाणार नाही, असाच इशारा दिला.अरविंद पवार हा शिवसेनेचा पूर्वाश्रमीचा शिराळा तालुकाप्रमुख म्हणून राजकीय क्षेत्रात वावरत होता. १९९६ साली त्याने कुरळप येथे मिनाई निवासी आश्रमशाळा सुरू केली होती. तेथेच मनीषा कांबळे ही स्वयंपाकी म्हणून काम पाहत होती. राज्यातील तत्कालीन सत्ता आणि स्वत:च्या संपत्तीचा माज असणाऱ्या अरविंद पवार याने आपल्या दहशतीखाली आश्रमशाळेतील कोवळ्या अल्पवयीन मुलींनाच आपल्या वासनेची शिकार बनवत त्याने शाळेला एकप्रकारे कुंटणखानाच बनवून ठेवले होते.अरविंद पवारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या काही मुलींनी त्याच्या अन्यायाचा भांडाफोड करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये कुरळप पोलिस ठाण्यात कामगिरीवर असणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्या नावाने निनावी पत्र पाठवण्याचे धाडस केले. त्यानंतर अरविंद पवार आणि त्याची साथीदार मनीषा कांबळे या दोघांच्या पापाचा घडा भरला.वर्षानुवर्षे अनेक मुलींवर अत्याचार करणाऱ्या अरविंद पवार याने न्यायालयीन कामकाज सुरू असतानाही त्यामध्ये विलंब होईल, असे वर्तन ठेवले होते. याच दरम्यान शाळेतील इतर शिक्षकांमार्फत तक्रारदार पीडित मुलींवर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकणे, धमकावणे असेही प्रकार करत होता.शेवटी पाच वर्षांनंतर त्याच्या या कुकर्माची फळे भोगण्यासाठी सर्व साक्षी पुराव्यानंतर निकाल देताना न्यायालयाने या दोघांसह समाजाच्या इतर अनेक क्षेत्रांत अशाप्रकारे अन्याय अत्याचार करत असलेल्या प्रवृत्तींच्या उरात धडकी भरेल, असा निकाल दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे होत असताना असाह्य आणि अबला मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयामार्फत घेता आली, याचे समाधान आहे. -शुभांगी विक्रम पाटील, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी