शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; मनसेचा ८ जूनला शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा

By शीतल पाटील | Updated: May 29, 2023 19:16 IST

डिस्को बार संस्कृती फोफावली. अवैध व्यावसायिकांची पाठराखण सुरू

सांगली : जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, घरफोडी, मारामारी, खुनी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. डिस्को बार संस्कृती फोफावली आहे. पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. अवैध व्यावसायिकांची पाठराखण सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात ८ जून रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यापासून करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनाही निवेदन देण्यात आले. सावंत म्हणाले, पोलिसांच्याबाबत मनामध्ये कायम सन्मानाची भावना आहे. जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या घरफोडी, मारामारी, खुनी हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा फोल ठरली आहे. पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे फावले आहे.छोटे-छोटे व्यावसायिक, पान शॉप चालकांना वेळेचे बंधन घालण्यात येते. मात्र बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या डिस्को बारला पहाटेपर्यंत मुभा दिली जाते. नागरिकांच्या तक्रारीनुसार शेअर मार्केट कंपन्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र कारवाई झाली नाही. उलट त्या कंपन्यानांच संरक्षण देण्यात आले. याविरोधात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसमोर मनसेच्यावतीने आंदोलन करणार आहे. त्याची सुरवात ८ जून रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यापासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप टेंगले, दयानंद मलपे, जमीर सनदी, अमित पाटील, कुमार सावंत, सिद्धार्थ सूर्यवंशी, बबलू यादव, अमर औरादे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसMNSमनसे