शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

सांगली जिल्ह्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर; पीकस्थिती कशी, का करतात पैसेवारी, शेतकऱ्यांना काय फायदा.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:14 IST

जिल्हाधिकारी यांच्याकडून पैसेवारी जाहीर 

सांगली : खरीप हंगामातील पिकांची स्थिती आणि उत्पादनाचा अंदाज मिळविण्यासाठी पैसेवारी केली जाते. जिल्ह्यातील ७३६ गावांपैकी ६३३ गावांतील शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड केली जाते, तर १०३ गावे रब्बी हंगामासाठी आहेत. खरीप हंगामातील सर्व ६३३ गावांतील पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येते.जर ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्यास, त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सोयीसुविधा प्रदान केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पैसेवारीला फार महत्त्व आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली जाते आणि ३० डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होते. पैसेवारीच्या आधारावर यंदाची पीकस्थिती कशी आहे आणि सरासरी उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित असते.जिल्ह्यात खरिपात दोन लाख ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरीप हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कडधान्य आणि फळबागांना परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविला गेला आहे, जो खरीप पिकांसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे महसूल विभागाद्वारे जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीवरून जिल्ह्यात पीकस्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यातील हंगामी पीक पैसेवारीतालुका - ५० पैशांवर गावांची संख्यामिरज - ७२तासगाव - ६९क. महांकाळ - ६०जत - ५४खानापूर - ६८आटपाडी - २६पलूस - ३५कडेगाव - ५६वाळवा - ९८शिराळा - ९५

डिसेंबरला अंतिम पैसेवारी होणार जाहीरमहसूल विभागाने सध्या हंगामी पैसेवारी जाहीर केली असून, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाठविला आहे. अंतिम पैसेवारी डिसेंबर २०२५ रोजी निश्चित होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli's 633 villages show satisfactory crop condition with high yield estimates.

Web Summary : Sangli district reports favorable crop conditions, with 633 villages exceeding 50 paisa 'Paisevari'. Despite some crop damage from rains, overall, Kharif season shows promising yield estimates.