पलूस : पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मंगळवार, २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बिनशर्त मागे घेतले आहेत. यामुळे राष्ट्रवादीने या निवडणुकीत कोणतीही जागा न लढवता भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.या निर्णयामुळे पक्षातील इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याच्या अपेक्षेने तयारी केलेल्या अनेक कार्यकर्त्यांची स्वप्ने या निर्णयामुळे भंग पावली आहेत. काही कार्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. पलूस नगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप व राष्ट्रवादी यांच्यात युती झाली नव्हती. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.सांगली महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाला यश मिळाल्यामुळे पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक नेत्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. या निर्णयाबाबत तालुक्यातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत दाद मागण्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे भाजपची तालुक्यातील राजकीय ताकद वाढण्याची शक्यता असली, तरी नाराज कार्यकर्ते आगामी काळात कितपत सक्रिय राहतील, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करते, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.वाटचालीबाबत प्रश्नचिन्हपलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदीप कदम व नीलेश येसुगडे यांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर मजबूत होत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तालुक्याशी संबंधित राजकीय हालचाल थांबल्याने पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत संभ्रम आहे.
अजितदादांचे निधन झाल्याने पक्षात पोकळी निर्माण झाली. निवडणुकीसाठी पक्षाच्या सुचनेनुसार व आदेशानेच सर्व उमेदवारांनी माघार घेतली होती. ज्या इच्छुकांनी पक्षासाठी काम केले आहे त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. - प्रदिप कदम, माजी अध्यक्ष, पलूस-कडेगाव क्षेत्र राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष
Web Summary : In a surprising move, Ajit Pawar's NCP withdrew from Sangli ZP polls in Palus, backing BJP. This sparked discontent among local leaders who feel sidelined by the decision, impacting future political equations.
Web Summary : एक अप्रत्याशित कदम में, अजित पवार की एनसीपी ने पलूस में सांगली ZP चुनावों से नाम वापस ले लिया, भाजपा का समर्थन किया। इससे स्थानीय नेताओं में असंतोष फैल गया जो इस फैसले से अलग-थलग महसूस करते हैं।