शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून अनेकांना दिला वैद्यकीय सेवेचा आधार; तेच मिरजेचे 'मिशन हॉस्पीटल' बनले निराधार

By अविनाश कोळी | Updated: August 21, 2023 17:24 IST

वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्णपान निखळणार की जपले जाणार?

अविनाश कोळीसांगली : छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून राजे-महाराजे, नाट्य, चित्रपट, संगीत, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज हस्तींना, सामान्य माणसांना ज्या रुग्णालयाने वैद्यकीय सेवेचा आधार दिला ते ‘मिशन’ रुग्णालय आता अतिदक्षता विभागात दाखल झाले आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील हे सुवर्णपान निखळण्याच्या मार्गावर आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ राबवत अनेकांना मरणाच्या दाढेतून काढणाऱ्या या महाकाय हत्तीला आता मरणाच्या दाढेतून कोण काढेल का, असा अस्वस्थ सवाल उपस्थित केला जात आहे.कॅनेडियन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी मिरजेत १८९२ मध्ये स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने नावलाैकिक मिळविला. दिल्लीस्थित चर्च ऑफ नॉर्थ इंडियातर्फे संचलन करण्यात येणारे पाचशे खाटांची सोय असलेले वॉन्लेस रुग्णालय गैरव्यवस्थापन व रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या दहा वर्षांत मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. सद्य:स्थितीत रुग्णालयावर कोट्यवधींचे कर्ज असून, त्यापैकी सुमारे २० कोटींवर कामगारांची देणी आहेत.सांगली, मिरजेसह राज्यातील अनेक नामांकित खासगी डॉक्टरांची मिशन हॉस्पिटल ही कर्मभूमी राहिली आहे. जागतिक पातळीवरील नामांकित कंपन्यांच्या मशिनरी, अतिउच्च दर्जाचे व्यवस्थापन, सेवा-सुविधा, दिलासादायी उपचार पद्धत यामुळे हे रुग्णालय एकोणीसाव्या शतकातच देशभर चर्चेत आले होते. असा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे रुग्णालय रुग्णशय्येवर गेल्यानंतर त्याची सुशृषा करण्याची गरज आहे.

स्वस्तातल्या सोयीमहागड्या वैद्यकीय उपचारांनी त्रस्त असलेल्या सामान्य रुग्णांसाठी वानलेस रुग्णालय मोठा आधार होते. दीडशे रुपयांचा केसपेपर, १२० रुपयांत एक्स-रे, १५० रुपयांत सोनोग्राफीसह माफक दरात इकोकार्डिओग्राफी, हजार ते दीड हजारात मिळणाऱ्या स्पेशल रुम्स यामुळे हेे रुग्णालय सामान्यांसाठी मोठा आधार होते.

रुग्णालयाचे अंतरंग

  • वानलेस रुग्णालय, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यासह मिरज परिसरात ४९ एकर जागेवर रुग्णालयाचा विस्तार आहे.
  • रुग्णालयात सध्यस्थितीत ३६ वेगवेगळे अत्याधुनिक वैद्यकीय विभाग आहेत. एकाच छताखाली बहुतांश वैद्यकीय उपचार तसेच तपासण्यांची सोय या रुग्णालयात आहे.
  • वैद्यकीय सेवेसह नर्सिंग, डीएमएलटी, फिजिओथेरपीचे शिक्षण देणाऱ्या संस्थाही रुग्णालयामार्फत चालविल्या जातात.
  • एकूण ५०० बेडची सोय असलेले हे रुग्णालय आहे.

वऱ्हांड्यात झोपत होते रुग्णरुग्णालयाची ख्याती एकेकाळी अशी होती, की खाट फुल्ल झाल्यानंतर रुग्णांच्या इच्छेखातर वऱ्हांड्यात त्यांना गादी अंथरुण उपचार दिले जायचे. सध्यस्थितीत मात्र रुग्णालयाचे बहुतांश विभाग ओस पडले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल