शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने गंडा; मांत्रिकासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:30 IST

जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते.

सांगली : दैवी शक्तीच्याआधारे पैशाचा पाऊस पाडून देतो म्हणत, १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणखी चौघांना पोलिसांनी अटक केली. मांत्रिक रोहित भालचंद्र बेन्नाळकर (वय ३४, रा. अकलूज), संदीप सुभाष पाटील (३१, रा. अंजनी, ता. तासगाव), रोहित महादेव ऐवळे (३२, रा. खणभाग, सांगली) आणि अरुण शिवलिंग कोरे (३३, रा. म्हैसाळ, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सांगलीतील बादशाह पाथरवटसह दोघांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनील मोतीलाल व्हटकर (रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली होती.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापुरात राहणाऱ्या व्हटकर यांना त्यांच्या परिचित असलेल्या शिवानंद हाचगे याने संशयित मांत्रिक आणि पाथरवट पती-पत्नीची ओळख करून दिली होती. चौघांनी संगनमत करून १५ मे ते सोमवार, दि. २० जून या कालावधीत व्हटकर यांना अंकली येथे बोलावून घेतले. तिथे जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते.फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच व्हटकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बादशाह पाथरवट याच्यासह त्याच्या पत्नीला अटक केली होती. आता पोलिसांनी अन्य चौघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी