शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सांगलीतील साडेअकरा हजार लोकांवर ताबा सिद्धचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:15 IST

गायरान जमिनीवर घरे असणाऱ्यांचे धाबे दणाणले

सांगली : गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण कारवाईवर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच जिल्ह्यातील ११ हजार ४५५ गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना शासन पुन्हा नव्याने नोटिसा बजावणार आहे. या नोटिशीनुसार अतिक्रमणकर्त्यांना ३० दिवसांत ताबा सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यासह खुलासा द्यावा लागणार आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे.जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली होती. या समितीत संबंधित तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश होता. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाली असून, ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार होती. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणेही हटवून जमिनी ताब्यात घेण्यात येणार होत्या. पण, गायरान जमिनीवरील बांधकाम संदर्भात राज्य सरकारने पाठविलेल्या नोटिशींविरोधात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार पुन्हा गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटावची माेहीम राबविली जाणार आहे. गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण कारवाईवर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पुन्हा नव्याने नोटीस बजावली जाणार आहे. नोटिशीला ३० दिवसांत उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, नोटिशीमध्ये अतिक्रमण असणाऱ्या व्यक्तीला त्या जागेवरील ताबा सिद्ध करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत अतिक्रमण करणाऱ्यांनी ताबा सिद्ध केला नाही, तर ६० दिवसांनंतर पुन्हा कारवाई सुरू करण्याची सूचना हायकोर्टाने दिली.

गायरान जमिनीवर घरे असणाऱ्यांचे धाबे दणाणलेगायरान जमिनीवरील घरे असणाऱ्यांनी ३० दिवसांत ताबा सिद्ध न केल्यास त्यांच्या घरावर बुलडोझर चालणार आहे. यामुळे गायरान जमिनीवर घर असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणेतालुका - गायरान जमिनीतील बांधकामेमिरज              ३,५३६तासगाव          २,३८७क. महांकाळ  १,५५०जत                ५३३खानापूर         ४५४आटपाडी       २४७कडेगाव         १,०९३पलूस             १८८वाळवा           १,३६३शिराळा         १९७एकूण            ११,४६८

टॅग्स :Sangliसांगली