शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

Sangli: मिरजेतील शासकीय दूध योजना होणार इतिहासजमा, प्रतिसादाअभावी फेरनिविदा प्रक्रिया

By संतोष भिसे | Updated: June 1, 2024 17:40 IST

२०१३ पासून लिटरभर दुधावरही प्रक्रिया नाही

मिरज : कधीकाळी मिरजेचे भूषण ठरलेली शासकीय दूध योजना आता इतिहासजमा झाली आहे. शासनाने दुग्धविकास विभाग बंद केल्याने राज्यातील सर्वच शासकीय दूध योजनांचे अस्तित्व संपले आहे. त्यामध्ये मिरजेचाही समावेश आहे. योजनेला टाळे लागल्याने शेकडो कोटींच्या स्थावर संपत्तीचे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. मिरज डेअरीची सुमारे ५२ एकर जमीन काहींच्या नजरेत आली आहे.राज्यभरातील बंद पडलेल्या शासकीय दूध योजनांतील यंत्रसामग्री, उपकरणे यासह भंगार साहित्याच्या लिलावासाठी शासनाने ऑक्टोबर २०२३ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला होता; पण या भंगार साहित्याची किंमत पुरेशी नसल्याचे निविदा भरणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरविली. त्यामुळे लिलाव रहित झाला. आता पुन्हा नव्याने शासन निविदा प्रक्रिया राबविणार आहे.१० ते २० वर्षांपासून दूध योजना बंद असल्याने तेथील यंत्रसामग्री गंजून व किडून गेली आहे. ‘जैसे थे’ स्थितीत काढून न्यायची झाली, तरी हातात फार काही लागणार नाही अशी अवस्था आहे. अशीच अवस्था मिरजेतील योजनेचीही आहे. संपूर्ण यंत्रसामग्री व उपकरणे दुधाच्या आणि पाण्याच्या संपर्कात राहिल्याने त्या खराब झाल्या आहेत. सध्या योजनेच्या इमारतीची अवस्था एखाद्या मोठ्या भूत बंगल्यासारखीच आहे.

२०१३ पासून लिटरभर दुधावरही प्रक्रिया नाही२०१३ पासून मिरजेतील योजनेचा कामकाज पूर्णत: बंद आहे. अगदी एक लिटर दुधावरही प्रक्रिया झालेली नाही. फक्त प्रशासकीय कामकाज सुरू आहे. राज्यभरातून अतिरिक्त झालेले दूध भुकटी व लोणी तयार करण्यासाठी मिरजेत योजनेकडे येते; पण येथील कामकाज बंद असल्याने त्यावर वारणा डेअरीकडून प्रक्रिया करून घेण्यात आली. काहीवेळा अतिरिक्त दूध मिरजेतून केरळमध्ये पाठविण्यात आले. या दुधावर प्रत्यक्ष कोणतीही प्रक्रिया मिरजेत होऊ शकली नाही.

दुग्धविकास विभाग बंदशासनाने दुग्ध व्यवसाय विभाग पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सर्वच शासकीय दूध योजनांना टाळे लागले. ‘महानंद’सारख्या काही सुस्थितीतील योजना मदर डेअरीकडे किंवा राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाकडे (एनडीडीबी) हस्तांतरित केल्या. सरकारी योजनांच्या पुनरुज्जीवनाचा कोणताही विचार शासनापुढे नाही. या निर्णयाने मिरजेतील योजनेच्या शवपेटीवर जणू अखेरचा खिळा मारला गेला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजmilkदूध