शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे धाडस नाही - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:03 IST

'मानसिंगराव नाईक आमच्याच पार्टीचे'

इस्लामपूर : राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका घेण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. त्यातच त्यांनी विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. मालवणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास जनता खपवून घेणार नाही, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.ढगेवाडी (ता. वाळवा) येथील नूतन ग्राम सचिवालय आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच संदीप सावंत यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, संचालक रामराव पाटील, दीपक पाटील, अमरसिंह साळुंखे, ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत, बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड, कार्वेचे सरपंच शहाजी पाटील, ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, देवर्डेचे सरपंच अनंत पाटील, उपसरपंच स्नेहल माने उपस्थित होते. वैभव माने यांनी आभार मानले.

मानसिंगराव आमचेच..आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेविषयी विरोधकांत आजही संभ्रम आहे. आमदार नाईक शरद पवार गटाचे की, अजित पवार गटाचे? यावरून कार्यकर्त्यांत उलट-सुलट चर्चा होती. कार्यक्रमात ‘मानसिंगराव नाईक आमच्याच पार्टीचे आहेत,’ असे सांगत आमदार जयंत पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकारElectionनिवडणूक 2024historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज