शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर पाथरपुंज, कोळणे गावच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत हालचालीस वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:39 IST

विकास शहा शिराळा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज आणि कोळणे या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी ...

विकास शहाशिराळा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज आणि कोळणे या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यासाठी वन विभागाच्या हालचालीस वेग आला आहे. पाथरपुंजच्या ९१ व कोळणेच्या २४ कुटुंबांनी वनक्षेत्रामधील जमिनी राहण्यासाठी (वसाहत) व शेतीसाठी पसंत केलेल्या आहेत तसेच पंधरा कुटुंबांचा जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसन प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत सर्व प्रस्ताव वन विभागामार्फत तयार करण्यात येत आहेत.कोयनानगरच्या नैर्ऋत्येला असलेले पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (कोअर झोन) म्हणून घोषित झाले असल्याचे या तीन गावांचे स्थलांतर करून पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे शासनाने त्यावेळी जाहीर केले होते.ही गावे स्थलांतर करण्याची आहे म्हणून या गावातील जनतेला वाहतूक व्यवस्था, शाळा शैक्षणिक सुविधा आदी नागरी सुविधांपासून आजपर्यंत वंचित आहेत. येथील नागरिक अनेक वर्षांपासून कसत असलेली शेती २००४ पासून कसू नये, असे शासनाने वन विभागास कळविले आहे. त्यामुळे तीन गावांचा उदरनिर्वाह बंद झाल्याने जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. पुनर्वसन व्हावे यासाठी येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कारही टाकण्याचा पवित्रा घेतला होता.जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसनासाठी तयार असणाऱ्या कुटुंबीयांना पंधरा लाख रुपये व त्यांचे मालमत्ता मूल्यांकन करून निधी देणे, अंतरंग यावर्षी पुन्हा पंधरा कुटुंबांचा जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसन प्रस्ताव वन्यजीव विभागाकडून जात आहे. तसेच सांगली वन विभागामार्फत पाथरपुंज, मौजे कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांकरिता ढाणेवाडी, येडे, उपाळेवांगी व तोंडोली येथील २१०.०२ हे. वनजमीन निर्वणीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

चांदोली अभयारण्यातील मौजे पाथरपुंज व मौजे कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांना सांगली वन विभागांतर्गत मौजे ढाणेवाडी, येडे, उपाळेवांगी व तोंडोली येथील वनक्षेत्रामधील जमिनी दाखविण्यात आल्या असून प्रकल्पग्रस्तांना वरील वनक्षेत्रामधील जमिनी राहण्यासाठी व शेतीसाठी पसंत केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने २१०.०२ हे. वनजमीन निर्वणीकरणाचा वन (संरक्षण एवं संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. - डॉ. अजित साजने, सहायक वनसंरक्षक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर