शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिले लग्न लपवून दुसरे केले, सांगलीत महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा

By संतोष भिसे | Updated: October 17, 2024 16:02 IST

सांगली : पहिला विवाह लपवून ठेवून दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याप्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९, रा. इनाम ...

सांगली : पहिला विवाह लपवून ठेवून दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याप्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९, रा. इनाम धामणी, ता. मिरज) या महिलेविरोधात सांगली ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्याविरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. आष्टा) यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंदना ही सांगली पोलिस दलात सेवेत आहे.वंदना हिच्यासोबत जनाबाई चंद्राप्पा कांबळे (वय ६०), राजशेखर चंद्राप्पा कांबळे (वय ४२), उषा शंकर माळी (वय ४०, सर्व रा. इनाम धामणी) यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरी करतात. त्यांचा विवाह वंदना हिच्याशी २२ जून २०२२ रोजी झाला होता. विवाहानंतर आठवडाभरातच म्हणजे ३० जूनरोजी ती माहेरी इनाम धामणीला निघून आली. महेश यांचे मामा सुहास पठाणे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन महेश हे वैवाहिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत अशी तक्रार केली.मी नांदण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. महेश व त्यांच्या कुटुंबाने माझी फसवणूक केली, त्याबद्दल नऊ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. पैसे न दिल्यास खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. यादरम्यान, वंदना, जनाबाई, राजशेखर व उषा यांनी महेशच्या घरी माणसे पाठवून दिली. महेशच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. दरम्यान, महेश यांनी न्यायालयात तक्रार केली की, वंदना हिच्या आरोपांमुळे आपल्या लौकिकास बाधा पोहोचली आहे. वंदनाविषयी चौकशी केली असता तिचा पहिला विवाह सांगलीतील संजय राजाराम शिंदे (रा. वखारभाग) यांच्याशी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी वंदना व अन्य तिघा संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस