शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागतोय हजारोंचा भुर्दंड, ऊसतोड टोळ्यांकडून लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:14 IST

साखर कारखाना नियंत्रण ठेवण्याची गरज

महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, तालुक्यात विविध कारखान्यांची ऊसतोडणी सुरू आहे. पण, उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना उसाची तोडणी करण्यासाठी ऊसतोड टोळीच्या पाठीमागे लागावे लागत आहे व ऊसतोड करणाऱ्यांकडून आर्थिक व जेवणाची मागणी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी एकरी हजारोपर्यंत रक्कम घेऊन ऊस तोडला जायचा. मात्र, त्यातही यंदा आणखीन मजुरांची संख्या कमी असल्याने हा रेट वाढतच चालला आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांवर ऊसतोड मजुरांना पार्ट्या आणि हजारो रुपये देऊन ऊसतोड करण्याची वेळ आलेली आहे. अनेक मोठ्या ठिकाणी रकमा घेऊनही टोळ्या फरार झाल्याचे चित्र आहे. मजुरांअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे.ऊसतोडणी लांबत चालल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदारांनी लक्ष देऊन कार्यक्षेत्रात नोंद असलेला ऊस योग्य वेळेत तोडून नेण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. कारखानदारांनी या ऊसतोड करणाऱ्या मुकादम, ठेकेदार, ऊसतोड यांच्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी आता करू लागले आहेत.अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस अडचण 

कवठेमहांकाळ तालुक्यात अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. रेल्वेचे छोटे भुयारी पूलही उसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकसाठी अडचणीचे ठरत आहेत. तर, वाहनधारकांना प्रवास करतानाही अडचण येत आहे. तर, राष्ट्रीय महामार्गावर ऊस ट्रॅक्टर टॉल्या उभ्या असतात. याकडे पोलीस प्रशासनाने कारवाई केली.

ऊसतोड करण्यासाठी विविध कारखान्यांच्या टोळ्या गावात आल्या असून, शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्यानंतरच ऊस तोडणाऱ्या टोळ्या प्रसन्न होत असल्याने सगळीकडे हाच ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अन्यथा कारखानदारांच्या विरोधात उपोषणास बसणार आहे. -अंकुश कांबळे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कोकळे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने