शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण, माजी खासदारांनी मारहाण केल्याचा मुल्ला यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:41 IST

आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील याच्या समर्थकांनी आज, शुक्रवारी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. यावेळी संजयकाका पण उपस्थित होते. त्यांनीही मला मारहाण केल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. तसेच माझ्या ७६ वर्षांच्या आईला ढकलून दिले आणि कुटुंबीयांना पण मारहाण केल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. ही घटना आज सकाळी साडे सातच्या सुमारास घडली.कवठेमहांकाळ येथे सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून  मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

या घटनेनंतर माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस