शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ४२९ लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:25 IST

बेघरांना कोणी जागा देणार का! : प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप

सांगली : जिल्ह्यातील बेघरांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नसल्यास शासनाकडून अनुदान दिले जाते. दरम्यान, घर बांधण्याकरिता जागा नसलेल्यांच्या सर्व्हेनुसार ४२९ लाभार्थ्यांना जागेची गरज आहे. मात्र, शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही लाभार्थ्यांना जागा मिळत नसल्यामुळे त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. स्वत:च्या मालकीची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना स्वप्नातील घराची प्रतीक्षाच असल्याचे चित्र पाहायला मिळते.जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल दिले जात आहेत. ज्या लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी स्वत:ची जागाच नाही, अशांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. स्वत:ची जागा नसल्याने उन्हाळा असो की हिवाळा- पावसाळा, उर्वरित लाभार्थ्यांना उघड्यावर अथवा कच्च्या, छपराच्या घरातच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.शासनाकडे वारंवार जागा मिळावी, यासाठी लाभार्थी फेऱ्या मारत असूनही त्यांना प्रशासनाकडून जागा उपलब्ध होत नाही. म्हणून लाभार्थी नाराज आहेत. काही लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा शेवटचा मार्ग स्वीकारला आहे, असे लाभार्थी सुरेश कांबळे यांनी सांगितले.

शासकीय जागा उपलब्ध असूनही मिळत नाहीप्रधानमंत्री आवास योजना, शबरी, इंदिरा आवास अशा योजनांच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी जागा नाही म्हणून घरकुल मंजूर असूनही लाभार्थ्यांना बांधता येत नाही. जागा महाग असल्याने हे अनुदान कमी पडते आणि त्यामुळे लाभार्थ्यांनी या अनुदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. तसेच शासकीय जागा उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून ते वेळेत मिळत नसल्यामुळेही लाभार्थी नाराज आहेत.

घरकुलासाठी जागा नसलेले लाभार्थी संख्यातालुका - लाभार्थी संख्या

  • आटपाडी - ३
  • जत - ८५
  • कडेगाव - ६६
  • कवठेमहांकाळ - १८
  • खानापूर - ७२
  • मिरज - ५४
  • पलूस - १८
  • तासगाव - ९४
  • शिराळा - ८
  • वाळवा - ११
टॅग्स :SangliसांगलीHomeसुंदर गृहनियोजन