शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मिरज दुहेरीकरणातील आंबळे घाटाचे दुहेरीकरण पूर्ण, आता किती काम बाकी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:04 IST

२०१७ पासून पुणे मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू

मिरज : पुणे-मिरज दुहेरीकरण कामातील सर्वांत कठीण अशा शिंदवणे – आंबळे घाटाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे–सातारा १४५ किमी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, २७९ कि.मी. लांबीच्या पुणे – मिरज मार्गापैकी २५८ कि.मी. अंतर आता कार्यान्वित झाले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत दुहेरीकरण पूर्ण होऊन रेल्वेगाड्याची संख्या वाढणार आहे.मध्य रेल्वेने पुणे–मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पुण्याजवळ शिंदवणे – आंबळे घाटाचे १० कि.मी. दुहेरीकरण पूर्ण केले आहे. हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक, डोंगराळ, अवघड वळणांचा भरलेला व बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे येथील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण खूप कठीण होते. १७ जून २०२५ रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर नवीन दुहेरी मार्गांवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. २०१७ पासून पुणे मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू असून, आता २२ किमी काम बाकी आहे. शिंदवणे–आंबळे दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी १४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधण्यात आला. तीव्र उतार असल्याने कामासाठी अचूक योजना करावी लागली. १३ भागांत विभागलेला एक मोठा पूल बांधला. ज्यात सर्वांत उंच खांब ४२ मीटर उंच आहे. हा पूल एका वर्षांत पूर्ण झाला. यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा १८.३ मीटर उंच आहे. ३० लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केले गेले आहेत. २३ छोटे पूल या मार्गावर बांधले गेले. यात १६ तीव्र वळणे आहेत.गाड्या वेळेवर धावतीलशिंदवणे – आंबळे घाटातील दुहेरीकरण झाल्यामुळे रेल्वेमार्गावरील गर्दी कमी होऊन, गाड्या वेळेवर धावतील. दुहेरीकरणामुळे जास्त गाड्या धावणार असल्याने प्रवासी व मालगाड्यांची संख्या वाढणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.