शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फुकट कपडे व महिन्याला हप्त्याची मागणी, मिरजेत गुन्हेगाराने कापड विक्रेत्याला दिली खुनाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:11 IST

‘मी खुनाच्या गुह्यातून सुटून आलोय. मला फुकट पॅन्ट व शर्ट व महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता दिला नाहीस तर तुझा खून करीन,’

मिरज : मिरजेत वखार भाग येथील कापड दुकानात फुकट कपडे व दर महिन्याला हप्त्याची मागणी करत कापड विक्रेत्याला खुनाची धमकी दिल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार नीलेश परशुराम सलगर (रा. मिरज) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कापड दुकानदार योगेश अरुण शिंदे (वय २६) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. नीलेश सलगर हा मिरजेतील प्रदीप हंकारे खून प्रकरणातील आरोपी आहे.मिरजेत कोकणे गल्लीत शिंदे यांचे तयार कपड्याचे दुकान आहे.  दि. २८ फेब्रुवारी रोजी नीलेश सलगर हा दोघा साथीदारांसोबत शिंदे यांच्या कापड दुकानात आला. यावेळी योगेश शिंदे हे गिऱ्हाईकांना कापड दाखवत असताना नीलेश सलगर याने त्यांना दमबाजी केली. मला प्रत्येक महिन्याला एक जोड नवीन कपडे व हप्ता दे, अशी मागणी करून सलगर याने शिवीगाळ केली.त्यानंतर सुमारे तीन हजार रुपये किमतीचे  पॅन्ट व शर्ट घेऊन नीलेश सलगर निघत असताना  योगेश शिंदे यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी निलेश याने आपण खुनाच्या गुन्ह्यातून सुटून आलो आहे. फुकट कपडे हवेत, शिवाय दरमहा एक हजार रुपयांचा हप्ताही मागितला.  याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला अद्याप अटक केलेली नाही.कोयता घेऊन ये रे...यावेळी नीलेशने ‘मी खुनाच्या गुह्यातून सुटून आलोय. माझ्यावर भरपूर केसेस आहेत. मला फुकट पॅन्ट व शर्ट व महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता दिला नाहीस तर तुझा खून करतो,’ अशी धमकी दिली. यावेळी नीलेश याने त्याच्या साथीदाराला ‘कोयता घेऊन ये रे,’ असे म्हणत योगेश शिंदे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस