शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
2
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
5
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
6
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
7
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
8
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
9
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
10
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
11
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
13
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
14
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
15
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
16
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
17
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
18
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
19
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
20
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP News: इच्छामरणाची परवानगी द्या, ठेकेदाराची सीईओंकडे मागणी; नेमकं प्रकरण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:03 IST

कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा दिला इशारा

सांगली : जिल्हा परिषदेच्या कवठेमहांकाळ येथील जागा बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर विकसित करण्यासाठीच्या कामाची निविदा मंजूर झाल्यानंतरही १७ वर्षे उलटूनही वर्क ऑर्डर दिलेली नाही. न्यायालयाने लवाद नेमून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता, पण त्याचेही पालन होत नाही. या कामासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले असून जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे इच्छामरण अथवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अन्यथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा अर्जदार गुलाबराव शंकर माने यांनी दिला आहे.माने यांनी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले आहे.माने यांनी दिलेली निवेदनात म्हटले की, जिल्हा परिषदेने २००८ मध्ये काही जागा विकसित करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदामधील अटी आणि शर्तींनुसार आम्हाला निविदा मंजूर झाली. त्यासाठी शासन पातळीवरील सर्व मंजुरी घेण्याचे काम केले. त्यानुसार ते ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई तसेच इतर आवश्यक विभागांकडून वेळेत मंजुरी मिळवण्यात यशस्वी झाले. मात्र, तदनंतरही जिल्हा परिषदेने या कामासाठी वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली. वर्क ऑर्डरसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत होते.अनेकदा चर्चा होऊनही २०१७ पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत. म्हणून जिल्हा परिषदेच्या विरोधात न्यायालयात तक्रार केली. काही दिवस सुनावणी सुरू राहिली, पण कोरोना काळात सुनावणी काही काळ थांबली. एप्रिलमध्ये न्यायालयाने तातडीने लवाद नेमून तडजोडीने निकाल काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेने लवाद नेमला. मात्र आवश्यक पाठपुरावा आणि लवादांना सहकार्य करणे जिल्हा परिषदेने केले नाही. त्यामुळे लवादांनी राजीनामा दिला.जिल्हा परिषद न्यायालयीन आदेशांचे पालन करत नाही. काम मंजुरीसाठी प्रचंड खर्च करावा लागल्यामुळे आर्थिक अडचणीत येऊन कर्जबाजारी झालो आहे. सध्या संपूर्ण कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिल्हा परिषदेकडून माझी फसवणूक झाली आहे. म्हणून मला आणि माझ्या कुटुंबीयांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दहा एकर जमीन विकूनही कर्ज फिटेना : गुलाबराव मानेमंजुरी मिळवण्यासाठी विविध टप्प्यांवर मोठा खर्च केला असून त्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दहा एकर जमीन विकावी लागली आहे. सध्या माझे कुटुंब वाऱ्यावर आहे. मूळ निविदामधून अपेक्षित उत्पन्न आणि सध्याची परिस्थितीमध्ये खूप तफावत आहे. निविदा मंजुरीनंतर जिल्हा परिषदेतील अंतर्गत राजकारणामुळे काही सदस्यांनी विरोध केल्यामुळे प्रकल्प रखडला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने २००८ मध्ये अपेक्षित उत्पन्न आणि सद्य:स्थितीत जागेची वाढलेली किंमत आणि नफा यामध्ये लक्षणीय फरक पडला आहे. काही लोकप्रतिनिधींचे मत आहे की या निविदेनुसार जागा दिली जाऊ नये. मात्र जर २००८ मध्ये निविदेचे काम सुरू करण्यास परवानगी दिली असती तर आतापर्यंत जिल्हा परिषदेचा मोठा आर्थिक फायदा झाला असता आणि आमचे नुकसान टळले असते, असेही तक्रारदार गुलाबराव माने म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Contractor Seeks Euthanasia Over Project Delay: A Detailed Report

Web Summary : Frustrated by a 17-year project delay despite winning a bid in 2008, a Sangli contractor requests euthanasia or threatens self-immolation at the Zilla Parishad office. He cites financial ruin due to the stalled BOT project, despite court orders for resolution.