शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सव्वातीनशे कोटी खर्चाचे आव्हान, दोन महिन्यात निधी खर्च करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:21 IST

शासनाकडून ६० टक्के निधी मिळणार कधी?

सांगली : राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनला ४८६ कोटींचा आराखडा मंजूर असून त्यापैकी १६१ कोटी रुपये खर्च झाले असून ३२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. शासनाकडून ४० टक्केच निधी मिळाला असून उर्वरित निधी खर्चानुसार मिळणार आहे. पण, शासनाकडून मिळालेला निधी ३१ मार्चपर्यंत १०० टक्के खर्चाचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे. दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक असून यामध्ये निधी खर्चाचे नियोजन होणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेमधून २०२४-२५ या वर्षात ४८६ कोटी रुपये मंजूर आहेत. यापैकी २११ कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. या निधीतून जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अन्य शासकीय कार्यालयांनी आतापर्यंत १६१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. हा निधी मागणीनुसार जिल्हा नियोजन विभागाने संबंधित विभागाला वितरित केला आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या ४० टक्के निधीपैकी ५० कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. उर्वरित ६० टक्के निधी म्हणजे २७५ कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. हा निधी येत्या दोन महिन्यांत खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार दि. २ फेब्रुवारीला सांगलीत आयोजित केली आहे. या बैठकीत शिल्लक निधी आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. पण, त्यापूर्वीचा निधी ३१ मार्च २०२५ अखेर खर्च करणे त्यांना सक्तीचे आहे.

शासनाकडून ६० टक्के निधी मिळणार कधी?राज्य शासनाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्याला जिल्हा नियोजनमधून ४८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी आतापर्यंत केवळ २११ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. उर्वरित २७५ कोटी रुपयांचा निधी कधी मिळणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाकडून शिल्लक निधी मिळणार की नाही, अशीही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या निधीला १० ते २० टक्के कात्री लागण्याची शक्यता असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी