शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजारांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांचा उद्रेक, सांगली जिल्हा परिषदेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:58 IST

अर्जस्वीकृती अचानक थांबविल्याने हवालदिल

सांगली : पदवीनंतरही अपेक्षित नोकरी मिळत नसल्याचा उद्रेक सोमवारी जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला. १५ हजार रुपये मानधनाची कंत्राटी नोकरभरती अचानक थांबविल्याने उमेदवार आक्रमक झाले. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण गायकवाड यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडत समुपदेशन केले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत १३६ कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत होती; पण पाच दिवस अगोदरच प्रशासनाने अर्जांची स्वीकृती अचानक थांबविली. तसे आदेश शासनाकडून आले होते. याची माहिती मिळताच दुपारपासूनच मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण जिल्हा परिषदेत गोळा झाले. शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या कक्षाबाहेर गर्दी केली. सायंकाळी गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी हवालदिल झालेल्या तरुणांनी गायकवाड यांच्याकडे भरती प्रक्रिया अचानक का थांबविली, याची विचारणा केली. दोन टप्प्यांत भरलेले अर्ज वेगवेगळे ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, असेही सांगितले. एकाच वेळी पन्नासभर युवक-युवतींनी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण होते. गायकवाड यांनी त्यांचे पूर्ण समाधान केले. ते म्हणाले, भरतीसंदर्भात शासन नव्याने निर्णय घेणार आहे. दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांत कंत्राटी स्वरूपात शिक्षकनियुक्ती केली जाणार आहे. अशा शाळांच्या गावातील स्थानिक पात्र उमेदवारांनाच सर्वोच्च गुणवत्तेनुसार नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. १३६ जागांसाठी ३००० अर्ज आल्याने गुणवत्ताच प्रमुख निकष असणार आहे. त्या जागेवर कायम शिक्षक नियुक्त होताच कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. शासनाने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवली असली, तरी आम्ही जिल्हा परिषद स्तरावर ते स्वीकारत आहोत. त्याबाबतचा पुढील निर्णय वरिष्ठ घेतील. त्यामुळे तरुणांनी कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. संयम बाळगावा. कोणावरही अन्याय किंवा कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. गायकवाड यांच्या खुलाशानंतर तरुण पांगले.

बेरोजगारांची रेटारेटी१५ हजार रुपये मानधनाची ही नोकरी कंत्राटी आहे. या जागेवर नियमित शिक्षक कधीही येऊ शकतो. तो येताच कंत्राटी तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे. तरीही अवघ्या काही महिन्यांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांची रेटारेटी सुरू आहे. फक्त १३६ जागा असतानाही हजारो तरुण त्यासाठी धावले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदjobनोकरी