शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: येरळा नदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला, पती बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:44 IST

एनडीआरएफची शोधमोहीम सुरूच

तासगाव : सोमवारी तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून एक दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेले. तेव्हापासून एनडीआरएफ पथकामार्फत शोध सुरू होता. बुधवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता नदी पात्रातील एका जॅकवेलमध्ये अडकलेला महिलेचा मृतदेह एनडीआरएफ पथकाच्या हाती लागला तर, बेपत्ता पतीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय उत्तम पवार व त्यांची पत्नी रेखा हे दोघे दुचाकीवरून तासगावहून कोरेगावला निघाले होते. वाटेत येरळा नदी पुलावरून दोघे दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफचे पथक पाचारण करून शोध सुरू केला. सलग तीन दिवस शोधकार्य सुरू होते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह गतीने असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत होते. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातील एका जॅकवेलमध्ये अडकलेला रेखा यांचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला.बुधवारी रेखा यांचा मृतदेह नदीपात्रातून शोधून काढल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती एनडीआरएफ टीमचे प्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांनी दिली. तर, पोलिसांनी रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या शोधकार्यात एनडीआरएफ टीमसह तहसीलदार अतुल पाटोळे तलाठी पतंग माने, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.

नदीपात्रात अत्यंत गतीने प्रवाह सुरू असलेल्या एका ठिकाणी काळ्या रंगाचे काहीतरी दिसले. त्याचा शोध घेण्यासाठी पथकाची बोट पुढे घेतली असता प्रचंड प्रवाहातून बोट बाजूला सरकत होती, मात्र अधिकच्या कसरतीने व अनुभवातून एनडीआरएफ पथकाने दोन बोटी एकत्र करून, शोध घेतला असता महिलेच्या हाताची दोन बोटे दिसून आली. पुढे पाहिल्यानंतर साडी जॅकवेलमध्ये अडकलेली दिसली. एकीकडे बोट स्थिर होत नव्हती आणि मृतदेह सोडला तर, पुन्हा तो शोधण्यास अडथळ निर्माण होणार होता. अशा थरारातून मृतदेह बाहेर काढण्यास एनडीआरएफला यश आले. - संदीप पवार, जवान, एनडीआरएफ

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीdrowningपाण्यात बुडणे