शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

10th, 12th Exam: 'तो' निर्णय परीक्षा मंडळाने घेतला मागे; त्याऐवजी घेतला नवा निर्णय.. जाणून घ्या

By संतोष भिसे | Updated: January 30, 2025 16:41 IST

कॉपीविरोधात मंडळ आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार

सांगली : दहावी, बारावी परीक्षांसाठी एका शाळेचे शिक्षक व कर्मचारी अन्यत्र नेमण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने मागे घेतला आहे. त्याऐवजी नवा निर्णय घेताना गैरप्रकार आढळणाऱ्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परीक्षा केंद्रात शिक्षकांच्या मदतीने सामूहिक काॅपी होत असल्याचे अनेक प्रकार परीक्षा मंडळाच्या निदर्शनास आले आहेत. याला आळा घालण्यासाठी यंदा शिक्षक व कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेवर नियुक्त करण्यात येणार होते. मात्र याला शिक्षक संघटना, संस्थाचालक व लोकप्रतिनिधींकडून बराच विरोध झाला. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. बुधवारी रात्री मंडळाने जारी केलेल्या एका प्रकटनाद्वारे हा निर्णय मागे घेत असल्याची माहिती सचिव देवीदास कुलाळ यांनी कळविली आहे.यादरम्यान, कॉपीमुक्तीसाठी मंडळ ठाम असून गैरप्रकार आढळल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ यावर्षीच्या परीक्षांत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रांवर अन्य शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.या प्रक्रियेत कोरोना काळातील म्हणजे २०२१ व २०२२ या वर्षीच्या परीक्षा वगळल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत प्रत्येक केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही केली जाणार आहे.

..तर केंद्र कायमचे रद्दफेब्रुवारी, मार्च २०२५ मधील परीक्षेत गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार असल्याचे परीक्षा मंडळाने कळविले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा