शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मोरबगीत वाळूतस्करांची दहशत, तलाठ्यावर तलवारहल्ल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:00 IST

घटनेने जत तालुक्यात उडाली खळबळ

संख : मोरबगी (ता. जत) येथे वाळूतस्करी रोखणाऱ्या तलाठ्यावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तलवारीची दहशत दाखवून कारवाईपासून रोखले. तलाठ्याच्या समोरून अवैध वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पळवून नेली. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.बभ्रुवाहन भानुदास शिंदे (वय ४०, रा. मोरे कॉलनी, जत) मोरबगीचे तलाठी आहेत. या परिसरात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे दि. ३० व ३१ दरम्यानच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोरबगी येथील हनुमान मंदिराजवळ साथीदारांसह ते थांबले होते.याच वेळी या मंदिराजवळून विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास वाळू घेऊन चालली होती. शिंदे यांनी ट्रॅक्टरचालक गुलाब मीरासाहेब सनदी (रा. भिवर्गी, ता. जत) याला थांबवले. अवैध वाळू वाहतुकीबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा वाळूतस्करीचा प्रकार समोर आला.तलाठी शिंदे यांनी वाहन ताब्यात घेतले. वाहनचालक सनदी यासही ताब्यात घेतले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास सनदी याचे सात सहकारी तेथे आले. त्यापैकी दोघांच्या हातात तलवारी होत्या. तलवारीच्या साह्याने त्यांनी दहशत पसरवली. तलाठी शिंदे यांच्यावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या साथीदारांवरही दहशत पसरवण्यात आली.त्यांच्यासमोरच ट्रॅक्टर-ट्रॉली आणि त्यातील एक ब्रास वाळू घेऊन लवंगा रस्त्याच्या दिशेने पसार झाले. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात तलाठी शिंदे यांनी गुलाब सनदी याच्यासह आठ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानुसार उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :SangliसांगलीsandवाळूCrime Newsगुन्हेगारी