शिक्षकांनी नवी आव्हाने स्वीकारावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:55+5:302021-09-06T04:30:55+5:30

शिक्षक दिनानिमित्त तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. हुजरे म्हणाले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...

Teachers need to accept new challenges | शिक्षकांनी नवी आव्हाने स्वीकारावीत

शिक्षकांनी नवी आव्हाने स्वीकारावीत

शिक्षक दिनानिमित्त तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. हुजरे म्हणाले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करतो. शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती देऊन ज्ञानी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संकल्पनांचा वापर करावा. समाजात शिक्षकांना आदराचे स्थान आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा शिक्षकांनी ऑनलाइन ज्ञानदानाचे काम अतिशय प्रभावीपणे पार पाडले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. आण्णासाहेब बागल यांनी स्वागत केले. कमिटी प्रमुख प्रा. आर. बी. मानकर यांनी आभार मानले. प्रा. एच. एल. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला डॉ. हाजी नदाफ, जगदीश सावंत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Teachers need to accept new challenges