शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पेपर तपासणीत शिक्षकांचीच परीक्षा, कमी दिवसामध्ये निकाल लावण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:47 IST

सांगली : पहिली ते नववीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शुक्रवारी (दि. २५) संपल्या. १ मे रोजी ...

सांगली : पहिली ते नववीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शुक्रवारी (दि. २५) संपल्या. १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत पेपर तपासण्याचे दिव्य शिक्षकांना करावे लागणार आहे.गेली काही वर्षे एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा होत होत्या. शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस अध्यापन व्हावे, असा नियम आहे. त्याचे पालन होत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्वच शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या. त्यानुसार ८ ते २५ एप्रिलदरम्यान राज्यभरात एकाचवेळी पहिली ते नववीच्या परीक्षा झाल्या. त्यानंतर १ मे रोजी निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे पेपर तपासणीसाठी फक्त ५ दिवसांचा कालावधी शिक्षकांच्या हातात आहे.उत्तरपत्रिका तपासून निकाल पत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण पोर्टलवर अपलोड करायचे आहेत, त्यानंतर त्याचे निकालपत्रही तयार करायचे आहे. याच कालावधीत संकलित चाचणी (पॅट) परीक्षाही झाली आहे, तिचे गुण ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करायचे आहेत. यामुळे शिक्षकांची एकच धांदल उडाली आहे. कमी पटसंख्येच्या छोट्या शाळांच्या तुलनेत मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. वार्षिक परीक्षा असल्याने अत्यंत बारकाईने पेपर तपासणी व निकालाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

सुटी एका दिवसाने घटलीदरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना उन्हाळा सुटी लागते, पण यंदा रमजान ईदची सुटी अतिरिक्त झाल्याने सुटी एक दिवस लांबणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्याही कमी झाल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षाTeacherशिक्षकResult Dayपरिणाम दिवसSchoolशाळा