खटाव येथील अपघातात शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:49+5:302021-06-25T04:19:49+5:30

फोटो २४ संजीव व्हणानावर लिंगनूर : बेळंकी (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक ...

Teacher killed in accident at Khatav | खटाव येथील अपघातात शिक्षक ठार

खटाव येथील अपघातात शिक्षक ठार

फोटो २४ संजीव व्हणानावर

लिंगनूर : बेळंकी (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील संजीव व्हणानावर (वय ४७, रा. खटाव) या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर माजी सैनिक सुरेश व्हणानावर हे गंभीर जखमी झाले आहेत.

संजीव व्हणानवर हे सुरेश यांच्यासह बेळकी येथून रात्री दहाच्या सुमारास खटावकडे येत होते. यावेळी बेळंकी-मिरज रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात संजीव यांना डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरेश व्हणानावर यांच्या हात, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. संजीव व्हणानावर हे लिंगनूर येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. खटाव येथील सरपंच सुजाता व्हणानावर यांचे ते पती व खटाव विकास सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब व्हणानावर यांचे कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या अपघाती निधनाने खटाव व लिंगनूर गावांत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Teacher killed in accident at Khatav