तासगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:35+5:302021-05-07T04:29:35+5:30
तासगाव : तासगाव तालुक्यात गुरुवारी कोरोनाचा कहर झाल्याचे चित्र दिसून आले. आरोग्य विभागाने ३६९ संशयितांची तपासणी केली. त्यापैकी १९३ ...

तासगाव
तासगाव : तासगाव तालुक्यात गुरुवारी कोरोनाचा कहर झाल्याचे चित्र दिसून आले. आरोग्य विभागाने ३६९ संशयितांची तपासणी केली. त्यापैकी १९३ कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
तासगाव तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी १९३ कोरोनाबाधित आढळून आले. तासगाव शहरात २२, आरवडे दोन, अंजनी तीन, बस्तवडे तीन, बोरगाव चार, चिंचणी १४, दहिवडी दोन, डोंगरसोनी चार, धुळगाव चार, हातनोली तीन, हातनूर एक, जरंडी दोन, कवठेएकंद एक, किंदरवाडी एक, कुमठे अठरा, लिंब दोन, लोढे व लोकरेवाडी एक, मणेराजुरी अठरा, मांजर्डे एक, मतकुणकी एक, मोराळे एक, नागेवाडी तीन, निमणी दोन, पेड एक, राजापूर सहा, सावळज बावीस, सावर्डे चार, शिरगाव वि. एक, सिद्धेवाडी चार, तुरची आठ, उपळावी दहा, वडगाव एक, वंजारवाडी दोन, वासुंबे सात, विसापूर चार, वाघापूर पाच, वायफळे एक आणि येळावी तीन रुग्ण आढळून आले. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६२२० झाली आहे. गुरुवारी १०२ रुग्ण बरे झाले असून, ११२२ उपचार घेत आहेत.