जत बाजार समितीत तळीरामांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST2021-03-01T04:29:56+5:302021-03-01T04:29:56+5:30

जत : जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात असलेले दुकानगाळे व गोदामासमोर तळीराम रात्री ...

Taliram's nuisance in Jat Bazar Samiti | जत बाजार समितीत तळीरामांचा उपद्रव

जत बाजार समितीत तळीरामांचा उपद्रव

जत : जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात असलेले दुकानगाळे व गोदामासमोर तळीराम रात्री अपरात्री बसून मद्यप्राशन करत आहेत. याशिवाय अर्वाच्य शिवीगाळ व काहीवेळा मारहाण करत आहेत. याचा नाहक त्रास बाजार समिती कर्मचारी व व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशा मागणी करणारे निवेदन बाजार समिती कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक जत यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तळीरामांचा व्यापारी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना सतत त्रास होऊ लागला आहे. काही तळीराम विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

रात्रपाळीसाठी असणाऱ्या बाजार समिती कर्मचाऱ्यांनी तळीरामांना दुकानासमोर बसण्यासाठी प्रतिबंध व मज्जाव केल्यानंतर त्यांना दोन वेळा मारहाण करण्यात आली आहे. या घटनेची पोलिसांनी व बाजार समिती संचालक मंडळाने दखल घेऊन त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Taliram's nuisance in Jat Bazar Samiti